1000 कोटींचा टप्पा पार करणार?
वीकेंड आणि आगामी दसरा सुट्टीचा ‘जेलर 2’ ला मोठा फायदा मिळत आहे. याच वेगाने कमाई सुरू राहिली तर हा चित्रपट लवकरच 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
4 दिवसांचे कलेक्शन किती?
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार,
पहिला दिवस – 59.90 कोटी
दुसरा दिवस – 39.10 कोटी
तिसरा दिवस – 48.25 कोटी
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 4 दिवसांत चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 199.90 कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन 234.25 कोटी रुपये झाले आहे.
परदेशात किती कमाई?
‘जेलर 2’ ने परदेशात तब्बल 190 कोटींची कमाई केली असून, 4 दिवसांत जगभरात एकूण 424.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘जेलर 2’ बद्दल
‘जेलर 2’ हा 2023 मधील ब्लॉकबस्टर ‘जेलर’चा सिक्वेल आहे. नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शन केले असून, अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत मोहनलाल, शिव राजकुमार, विद्या बालन, एस. जे. सूर्या, रम्या कृष्णन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, सुनील, योगी बाबू आणि हृतिक रोशन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘जेलर 2’मध्ये पहिल्या भागाच्या तुलनेत अनेक नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. यामध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता हृतिक रोशन यांचा समावेश आहे. याशिवाय विजय सेतुपती याच्याही विशेष भूमिकेची चर्चा आहे, तर नोराची फतेही चित्रपटातील ‘बिंदास’ या स्पेशल डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. पहिल्या भागात हे कलाकार नव्हते. या नव्या कलाकारांमुळे ‘जेलर 2’च्या स्टारकास्टमध्ये अधिक वैविध्य आले आहे.