Rishab Shetty Career: संपूर्ण देशाला आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने वेड लावणारा ऋषभ शेट्टी, आज “कांतारा” चित्रपटामुळे घराघरात पोहोचला आहे. पण त्याच्या यशाचा पाया मात्र मराठी नाटकावर उभा आहे आणि हेच फार कमी लोकांना ठाऊक आहे.
मराठी रंगभूमीवरून कन्नड चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास
आज 800 कोटींपेक्षा जास्त कमाई करून भारतीय सिनेमाचा चेहरा बदलणाऱ्या या अभिनेत्याचा अभिनय प्रवास विजय तेंडुलकरांच्या प्रसिद्ध मराठी नाटक ‘घाशीराम कोतवाल’पासून सुरू झाला होता. त्या नाटकात ऋषभनं “घाशीराम” ही भूमिका साकारली होती आणि हाच अभिनय त्याच्या आयुष्यातला पहिला मोठा टप्पा ठरला.
हेही वाचा - 'थामा' आणि एक 'दीवाने की दिवानीयत' OTT वर कधी आणि कुठे प्रदर्शित होईल? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना ऋषभ शेट्टीने आपल्या सुरुवातीच्या संघर्षकाळाविषयी सांगितलं. तो म्हणाला, 'सहावीत असताना मी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवलं. बारावीपर्यंत मी अनेक लहान भूमिका केल्या. आम्ही लोअर मिडल क्लास कुटुंबातून होतो. वडील ज्योतिषी होते आणि घरच्या परिस्थितीमुळे मी त्यांच्या मदतीसाठी छोट्या भूमिका करत राहिलो.'
हेही वाचा - Yogita Chavan and Saurabh Choughule: लग्नाच्या वर्षभरानंतरच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले विभक्त होणार?
‘घाशीराम कोतवाल’; अभिनयाचं पहिले पाऊल
बंगळुरूमध्ये एका कॉलेज नाटक स्पर्धेदरम्यान त्याला ‘घाशीराम कोतवाल’मध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली. यासंदर्भात बोलताना त्याने सांगितलं की, 'ते नाटक आम्ही कन्नडमध्ये सादर केलं होतं. आणि माझ्या अभिनयासाठी मला विद्यापीठाकडून ‘बेस्ट अॅक्टर’ पुरस्कार मिळाला. तेव्हाच मला समजलं की अभिनय माझं खऱ्या अर्थाने ध्येय आहे.'
या छोट्या मराठी नाटकापासून सुरू झालेला प्रवास अखेर ‘कांतारा’पर्यंत पोहोचला. ऋषभ शेट्टीने केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन आणि निर्मितीतही स्वतःला सिद्ध केलं. ‘कांतारा चॅप्टर 1’ने जगभरात 800 कोटींचा गल्ला कमावत भारतीय सिनेसृष्टीस नवा आयाम दिला. ऋषभच्या मेहनतीमुळे कन्नड आणि तमिळ सिनेसृष्टीच्या नव्या वाटा खुल्या झाल्या. एका सामान्य घरातून आलेल्या या अभिनेत्याने आज बड्या दिग्दर्शकांनाही मागे टाकलं आहे.