KBC मराठीला मिळणार पहिली करोडपती? रत्नाचा प्रोमो व्हायरल; माधुरी दीक्षित काय म्हणाली?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रिॲलिटी शो पैकी एक म्हणजे 'कोण होणार करोडपती'. हिंदीतील 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर मराठीतही ही मालिका सुरू करण्यात आली. आता या मालिकेत करोडपती विजेती भेटल्याची चर्चा सोशल मीडियावर सोनी टीव्हीच्या नव्या प्रोमोवरून रंगली आहे.
KBC मराठीला मिळणार पहिली करोडपती? रत्नाचा प्रोमो व्हायरल; माधुरी दीक्षित काय म्हणाली?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रिॲलिटी शो पैकी एक म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. हिंदीतील ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर मराठीतही ही मालिका सुरू करण्यात आली. आता या मालिकेत करोडपती विजेती भेटल्याची चर्चा सोशल मीडियावर सोनी टीव्हीच्या नव्या प्रोमोवरून रंगली आहे.

नेमके प्रोमोमध्ये काय आहे?

सध्या माधुरी दीक्षित हा शो होस्ट करत असून, करोडपती कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा शो 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाला असून अवघे 2 आठवडेच उलटले आहेत आणि आता करोडपती स्पर्धकाचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये रत्ना नावाची स्पर्धक माधुरीसमोर हॉटसीटवर बसलेली दिसत आहे. आजवर आलेल्या सेलिब्रिटी आणि स्पर्धकांनी माधुरीसमोर बसायला मिळाल्याने कौतुक वाटत असल्याचे म्हटले होते. मात्र, रत्नाने माधुरीला ‘माझ्यासमोर बसल्यावर तुम्हाला कसं वाटतंय?’ असा उलट प्रश्न विचारला.

यावर माधुरीने ‘माझ्यासमोर हिरो बसलाय असं वाटतंय’ असे उत्तर दिले. यावर रत्ना खूश झाली आणि ‘धन्यवाद, मी 1 कोटी जिंकले’ असे म्हणाली. म्हणजे रत्नाने प्रत्यक्षात 1 कोटी जिंकले की नाही, हे येणाऱ्या भागातच कळेल. पण प्रोमोनुसार, माधुरीच्या उत्तराने तिला 1 कोटी जिंकल्याचे समाधान मिळाले आहे.

आतापर्यंतच्या ‘कोण होणार करोडपती मराठीच्या सर्व पर्वांच्या इतिहासात केवळ एकाच जोडप्याने अंतिम प्रश्नाचे अचूक उत्तर देत 1 कोटी रुपयांचे महाबक्षीस जिंकले आहे. महादेव आणि अनिता जाधव हे जोडपे 2014 मध्ये विजेते ठरलेले.

हेही वाचा – आता मराठीत पाहा ‘क्राईम पेट्रोल’! उपेंद्र लिमये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; जाणून घ्या वेळ

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version