मुंबई: दरवर्षी, 14 जून रोजी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. तेव्हा, नाट्य कलाकारांना रंगभूमीतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी, ज्येष्ठ अभिनेत्री माननीय श्रीमती नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते माननीय श्री. सुरेश साखवलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
हेही वाचा: ना शाहरुख, ना सलमान, ना अक्षय; 'या' अभिनेत्यांकडे आहे सर्वात महागडी व्हॅनिटी व्हॅन
'या' ठिकाणी पार पडणार पुरस्कार सोहळा:
हा पुरस्कार सोहळा 14 जून 2025 रोजी दुपारी 4:00 वाजता यशवंत नाटय मंदिर, माटुंगा, मुंबई येथे पार पडणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार, उद्योगमंत्री तसेच अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हेही वाचा: Housefull 5 Piracy Hits: सिनेमागृहात झळकल्यानंतर काही तासांतच ‘हाऊसफुल 5’ लीक; चित्रपट निर्मात्यांना मोठा फटका
'या' कलाकारांना मिळणार व्यावसायिक नाट्य पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट लेखक: सुनिल हरिश्चंद्र आणि स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन),
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अद्वैत दादरकर (नाटक: शिकायला गेलो एक),
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी: प्रदीप मुळ्ये (नाटक: असेन मी नसेन मी),
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार: शीतल तळपदे (नाटक: मास्टर माइंड),
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार: निषाद गोलांबरे (नाटक: वरवरचे वधुवर),
सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार: राजेश परब (नाटक: गोष्ट संयुक्त मानापमानाची),
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक: असेन मी नसेन मी (संस्था: स्क्रीप्टज क्रिएशन),
सर्वोत्कृष्ट अभिनेता: सुव्रत जोशी (नाटक: वरवरचे वधुवर),
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: प्रशांत दामले (नाटक: शिकायला गेलो एक),
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: हृषीकेश शेलार (नाटक: शिकायला गेलो एक),
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: नीना कुलकर्णी (नाटक: असेन मी नसेन मी),
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: शर्मिला शिंदे (नाटक: ज्याची त्याची लव स्टोरी),
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: शुभांगी गोखले (नाटक: असेन मी नसेन मी),
अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार: निहारिका राजदत्त (नाटक: उर्मिलायन),
नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार: सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.