मुंबई: जेव्हा कधी अभिनेते शूटसाठी जातात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची व्हॅनिटी व्हॅनदेखील हजर असते. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अभिनेते आराम करतात, मेकअप करतात तसेच अनेक गोष्टी करतात. मात्र अनेकदा सर्वांना हा प्रश्न पडतो की, 'कोणत्या अभिनेत्याकडे सर्वात आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे?'. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
1 - अल्लू अर्जुन:
'पुष्पा फ्रेंचायझी' मध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता अल्लू अर्जुन यांच्याकडे सर्वात महागडी आणि आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. माहितीनुसार, अल्लू अर्जुन यांच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये आहे.
2 - महेश बाबू:
'गुंटूर कारम', 'महर्षी', 'एसएसएमबी29' चित्रपटात काम करून चाहत्यांना घायाळ करणारा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू जपगभरात लोकप्रिय आहे. अल्लू अर्जुनप्रमाणे महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन देखील खूप आलिशान आहे. माहितीनुसार, महेश बाबू यांच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 6.2 कोटी रुपये आहे.
हेही वाचा: ठाकरे युतीवर काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार?
3 - अक्षय कुमार:
'खिलाडी' अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी बॉलीवूडसह जगभरात ओळखला जातो. सूत्रानुसार, 'खिलाडी' अक्षय कुमारच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 5 कोटी रुपये आहे.
4 - शाहरुख खान:
'बॉलीवूडचा किंगखान' शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅन 14 मीटर लांब आहे. शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जिम, लिविंग एरिया, बेडरूम, वॉशरूम, इत्यादी आहे. या व्हॅनिटीची किंमत जवळपास 4 ते 5 कोटी रुपये आहे.
हेही वाचा: 'आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ'; युतीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
5 - सलमान खान:
'बॉलीवूडचा भाईजान' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याचा एक मोठा फोटो आणि काही नवीन गॅझेट्स आहेत. माहितीनुसार, सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटी रुपये आहे.
6 - अजय देवगण:
'बॉलीवूडचा सिंघम' अजय देवगणची व्हॅनिटी व्हॅन देखील खूपच आलिशान आहे. माहितीनुसार, अजय देवगणच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 3 कोटी रुपये आहे.