मुंबई: ठाकरे बंधू यांच्या युतीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक जबरदस्त वक्तव्य केले आहे, ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 'आम्ही संदेश देत नाही, तर थेट बातमी देऊ', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.
हेही वाचा: मंत्री छगन भुजबळांना दिलासा; विदेश प्रवासाची मुदत कोर्टाने वाढवली
'संदेश कशाला? मी बातमीच देईन' - उद्धव ठाकरे:
जेव्हा एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना, 'मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल?' असा प्रश्न विचारला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, 'संदेश कशाला? मी तुम्हाला बातमीच देईन. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ'.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार'. सध्या महाराष्ट्राच्या मनात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असेच आहे. 'भविष्यात हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?' अशी जोरदार चर्चाही सुरू आहे आणि असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.