मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या चर्चेत आली आहे. नुकताच तिचा चित्रपट 'मनाचे श्लोक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या 'मनाचे श्लोक' या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे नव्या मराठी चित्रपटावर वाद निर्माण झाले आहेत.
पुण्यात मनाचे श्लोक या चित्रपटाचे शो हिंदुत्ववादी संघटनेकडून बंद पाडण्यात आले. पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट कार्यकर्त्यांनी चालू शो मध्ये गोंधळ घालत शो बंद पाडला. हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखा प्रकार असल्याचे म्हणत चित्रपटाचे मनाचे श्लोक हे नाव बदलण्याची मागणीही हिंदुत्ववादी संघटनांनी केली.
हेही वाचा - Rekha Birthday Special : तीन दशकांपासून सिनेसृष्टीत राज्य करणारी 'ही' अभिनेत्री राहते आलिशान घरात
धार्मिक ग्रंथाचे नाव केवळ व्यावसायिक लाभ आणि मनोरंजनासाठी वापरणे, हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे असल्याचे समितीने म्हटले होते. मात्र या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
हेही वाचा - Mrs Universe 2025 : शेरी सिंगने इतिहास घडवला! 'मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धे'चा किताब पटकवणारी ठरली पहिली भारतीय महिला
'मनाचे श्लोक' हे शीर्षक चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही असं टीमने म्हटले होते.