Shalini Thackeray: श्वेता तिवारीच्या आरोपांवर मनसे आक्रमक; शालिनी ठाकरेंनी थेट पोस्ट करत सुनावले खडे बोल

श्वेता तिवारीने केलेले हे आरोप अत्यंत पोरकट आणि बिनबुडाचे असल्याचे शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.<br/>

Shalini Thackeray: श्वेता तिवारीच्या आरोपांवर मनसे आक्रमक; शालिनी ठाकरेंनी थेट पोस्ट करत सुनावले खडे बोल

Shalini Thackeray:  अभिनेत्री श्वेता तिवारी हिने इंटरनेटवर महिलांविषयी वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अपमानकारक भाषेविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तिने सोशल मीडियावर एका युझरचा स्क्रीनशॉट सामायिक करत संबंधित व्यक्ती व्यवसायाने डॉक्टर असल्याचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समर्थक असल्याचे म्हटले होते. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर आता मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी यावर थेट भाष्य करत श्वेता तिवारीच्या दाव्यांवर जोरदार पलटवार केला आहे. श्वेता तिवारीने केलेले हे आरोप अत्यंत पोरकट आणि बिनबुडाचे असल्याचे शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

“कोणाचाही फोटो असला तरी वैयक्तिक वागणुकीशी पक्षाचा संबंध नाही”

आपल्या सडेतोड निवेदनात शालिनी ठाकरे यांनी मनसेची बाजू मांडताना सांगितले की, एखाद्या विकृत व्यक्तीचा फोटो मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत आहे एवढ्यावरून त्या व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनाची जबाबदारी पक्षावर किंवा राज ठाकरेंवर ढकलणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. मनसे हा महाराष्ट्राची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणारा पक्ष आहे. स्त्रियांचा सन्मान करणे हे आमच्या मूळ संस्कारात आणि रक्तातच भिनलेले आहे. जर कोणी व्यक्ती महिलांशी गैरवर्तन करत असेल, तर त्याला आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याची क्षमता मनसे सैनिकांच्या मनगटात निश्चितच आहे. त्यामुळे मनसे आणि राज ठाकरे महिलांचा किती सन्मान करतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? 29 ऑगस्टला शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

प्रसिद्धीसाठी राजकारण न करण्याचा आणि गंभीर मुद्द्यांवर बोलण्याचा सल्ला

श्वेता तिवारीला खडे बोल सुनावताना शालिनी ठाकरे यांनी पुढे असेही नमूद केले की, कलाकारांनी स्वतःच्या एखाद्या शो किंवा कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी मराठी माणूस, मनसे अथवा राज ठाकरे यांच्या नावाचा गैरवापर करणे थांबवले पाहिजे. जर खरोखरच महिलांच्या हक्कांची आणि सुरक्षेची काळजी असेल, तर समाजात रोज घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांवर आणि महिलांवरील अत्याचारांवर कलाकारांनी जाहीरपणे आवाज उठवला पाहिजे. राज्यातील गायब होणाऱ्या तरुण मुलींचा प्रश्न असो किंवा सोशल मीडियावरील वाईट पद्धतीचे ट्रोलिंग असो, याविरोधात थेट सरकारला जाब विचारण्याचे धारिष्ट्य कलाकारांनी दाखवावे. या रोखठोक प्रत्युत्तरामुळे सध्या मनोरंजन विश्वात आणि राजकीय वर्तुळात हा वाद चांगलाच रंगला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number