Maanjar Movie: कोकण कोहिनूर ओंकार भोजनेचं मोठ्या पडद्यावर दणदणीत कमबॅक! भाग्यश्री लिमये, सिद्धार्थ मेननसह तगडी स्टारकास्ट; ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज

ओंकार भोजनेच्या कमबॅकची चर्चा असलेल्या ‘मांजर’ सिनेमाचा भन्नाट टीझर प्रदर्शित झाला आहे. मित्रांची धमाल, गोंधळ आणि मांजराचा रहस्यमय संबंध यामुळे सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Maanjar Movie: कोकण कोहिनूर ओंकार भोजनेचं मोठ्या पडद्यावर दणदणीत कमबॅक! भाग्यश्री लिमये, सिद्धार्थ मेननसह तगडी स्टारकास्ट; ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता ओंकार भोजने आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी मराठी चित्रपट ‘मांजर’ सध्या चर्चेत असून सिनेमाचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरमधील भन्नाट प्रसंग आणि कलाकारांची केमिस्ट्री पाहता हा चित्रपट मनोरंजनाची मेजवानी ठरण्याची शक्यता आहे.

‘मांजर’मध्ये सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने आणि तेजस राऊत या मित्रांची मजेशीर दुनिया पाहायला मिळणार आहे. या तिघांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या काही घटनांमुळे परिस्थिती कशी बदलते, याची झलक टीझरमधून मिळते. मस्ती, गोंधळ, धावपळ आणि मित्रांमधील भन्नाट संवाद यामुळे टीझर सुरुवातीपासूनच लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा: उत्तर अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळाचे 22 वे संमेलन सिॲटलमध्ये दिमाखात संपन्न!

या कथेत भाग्यश्री लिमयेचीही महत्त्वाची भूमिका असून ती या मित्रांच्या विश्वाचा एक भाग बनताना दिसते. विशेष म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे यांची झलकही टीझरमध्ये दिसते. त्यांच्यासोबत अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे ‘मांजर’मध्ये मोठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या नावामुळेही प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टीझरच्या शेवटी ऐकू येणारा मांजराचा आवाज या उत्सुकतेत आणखी भर घालतो. या मांजराचा कथेशी नेमका काय संबंध आहे, ते अद्याप निर्मात्यांनी उघड केलेले नाही. त्यामुळे सिनेमाच्या कथानकाबाबतची उत्सुकता कायम आहे.

सिद्धार्थ मेनननेही चित्रपटातील मैत्री, विनोद आणि गोंधळाच्या विश्वाबद्दल भाष्य करताना मांजर हा कथेत महत्त्वाचा घटक असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्याची खरी भूमिका काय आहे, हे पडद्यावरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Priya Berde : 'स्वामींनीच वाचवलं…'; मुंबईला परतताना प्रिया बेर्डे यांच्या बसचा अपघात; अभिनेत्रीने सांगितली भयावह प्रसंगाची आपबीती

सुशील महादेव यांनी ‘मांजर’चं दिग्दर्शन केलं असून टीझरवरून हा सिनेमा हलक्याफुलक्या मनोरंजनासोबतच काही अनपेक्षित ट्विस्ट घेऊन येणार असल्याचं दिसतंय. ओंकार भोजनेच्या कमबॅकसोबतच ‘मांजर’ची कथा प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number