Aishwarya Rai Duplicate from Pakistan : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे चाहते जगभरात आहे. पण हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी एक पाकिस्तानी महिला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ही महिलादेखील खूप लोकप्रिय आहे. या महिलेच्या चेहऱ्याची रचना आणि डोळे ऐश्वर्या रायसारखेच दिसतात. ती ऐश्वर्यासारखी दिसत असल्याने बरेचदा तिची चर्चा होत असते. तिचा आवाजही ऐश्वर्यासारखा आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ती 776 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अगदी ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या पाकिस्तानी बिझिनेस वुमनबद्दल माहिती देणार आहोत.
कोण आहे ऐश्वर्यासारखी दिसणारी पाकिस्तानी महिला?
अगदी ऐश्वर्याप्रमाणे दिसणाऱ्या या पाकिस्तानी महिलेचं नाव कंवल चीमा आहे. ती एक बिझनेस वुमन आहे. कंवल चीमाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि लोक म्हणतात की, ती हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसते.
कंवलचा जन्म पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे झाला. पण ती लहान असताना आई-वडिलांबरोबर सौदी अरेबियातील रियाध इथे गेली. तिचं शिक्षण रियाधमधील अमेरिकन आणि ब्रिटिश शाळेत झालं. तिचं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी पाकिस्तानला परतली.
हेही वाचा - दारुड्या माकडांबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? त्यांचं 'सोशल ड्रिंकिंग'ही असतं आणि जास्त ढोसली तर त्यांनाही होतो 'हँगओव्हर'!
कंवल चीमा काय करते?
कंवल चीमा ही पाकिस्तानी वंशाची ऑस्ट्रेलियन व्यावसायिक महिला आहे. ती माय इम्पॅक्ट मीटर (My Impact Meter) नावाच्या कंपनीची संस्थापक आणि सीईओ आहे. ही एक एनजीओ असून या व्यासपीठाचा उद्देश गरजूंना मदत करणे हा आहे. माय इम्पॅक्ट मीटर ही संस्था एक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील अशा लोकांना जोडते, जे गरजू लोकांना मदत करतात. कंवल चीमा यांच्या या संस्थेद्वारे जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. ती थॅलेसेमिया मोहीम चालवते. तसेच तरुणांसाठी ‘सीखो आणि कमाओ’ नावाचा उपक्रमही राबवते.
दरम्यान, कंवल चीमा याआधी 200 बिलियन डॉलर्सच्या कंपनीत काम करायची. पण तिने नोकरी सोडून स्वतःचे हे काम सुरू केले.
कंवल चीमाने सोडली नोकरी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंवल चीमा एका 200 बिलियन डॉलर्स व्हॅल्यू असलेल्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी करत होती. पण तिने पाकिस्तानमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि समाजकार्यासाठी तिची नोकरी सोडली.
ऐश्वर्या रायशी होणाऱ्या तुलनेबद्दल कंवल चीमा म्हणते…
एकदा तर, ती ऐश्वर्यासारखी दिसते याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता. एका पाकिस्तानी पत्रकाराने कंवल चीमाला विचारलं होतं की लोक तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी करतात. आवाज आणि दिसणं दोन्ही ऐश्वर्या राय सारखं आहे, असं म्हटल्यावर कंवल चीमाने यावर उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तिने ही तुलना आवडत नसल्याचे म्हटले होते.
‘मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही,’ असं ती म्हणाली होती. लोक नेहमी तिची तुलना बॉलीवूड सुपरस्टार्सशी करतात, ही गोष्ट कंवल चीमा हिला अजिबात आवडत नाही. “तुम्ही माझे भाषण ऐकलं नाही, जर ऐकलं असेल तर मग माझ्या दिसण्याबद्दल प्रश्न का विचारता? भाषणाबद्दल बोला,” असं कंवल चीमा म्हणाली होती. तिने तिच्या दिसण्याविषयी प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या कामाविषयी आणि विचारांबद्दल प्रश्न विचारावेत, असे म्हटले होते.
हेही वाचा - Eid al-Adha: बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देऊ नका; या मुस्लिम देशातील राजाचं नागरिकांना आवाहन, हे आहे कारण
ऐश्वर्या रायसारखी दिसणारी बॉलीवूड अभिनेत्री
चीमा व्यतिरिक्त ऐश्वर्या रायसारखी दिसणारी एक बॉलीवूड अभिनेत्री आहे. ती म्हणजे स्नेहा उल्लाल. स्नेहाला ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानने इंडस्ट्रीत लाँच केलं होतं. स्नेहा तिच्या करिअरपेक्षा ऐश्वर्यासारखी दिसते, त्यामुळे चर्चेत राहिली.