King Mohammed VI Eid al-Adha Message: इस्लाममध्ये कुर्बानीला खूप महत्त्व आहे. बकरीद ईदच्या दिवशी प्रामुख्याने कुर्बानी दिली जाते. या वर्षी ईद अल-अधा किंवा ईद-उल-अजहा जूनमध्ये साजरा केला जाईल. बकरी ईदच्या दिवशी बकरी, मेंढी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते. बळी दिलेल्या प्राण्याचे मांस कुटुंब आणि ओळखीच्या लोकांमध्ये वाटले जाते आणि गरिबांना दान केले जाते. परंतु इस्लामिक देश मोरोक्कोने आपल्या लोकांना यावर्षी ईद-उल-अजहानिमित्त बकऱ्यांची कत्तल करू नये असे आवाहन केले आहे.
जगभरातील मुस्लीम 7 जूनला बकरी ईद साजरा करतील. मात्र, मोरोक्को हा इस्लामिक देश असूनही येथे बकऱ्या किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. यामागील कारण असे आहे की, अनेक वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे या देशात बकऱ्या, मेंढ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
प्राण्यांची संख्या 38% ने कमी झाली
अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दशकात पाऊस आणि पाण्याअभावी चाऱ्याची कुरणे कोरडी पडली. यामुळे मोरोक्कोमध्ये गुरेढोरे आणि मेंढ्यांची संख्या 38% ने कमी झाली आहे. मोरोक्कोमध्ये मांसाचे भाव गगनाला भिडत आहेत आणि ऑस्ट्रेलियातून एक लाख शेळ्या-मेंढ्या, गुरे आयात केली जात आहेत.
धार्मिक व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर झालेल्या भाषणात म्हटले आहे की, राजा मोहम्मद सहावा म्हणाले की, अशा कठीण परिस्थितीत हा कुर्बानीचा धार्मिक विधी करणे आपल्या अनेक नागरिकांसाठी, विशेषतः कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हानिकारक ठरेल. 1966 मध्ये जेव्हा मोरोक्कोमध्ये दीर्घकाळ दुष्काळ पड,ला तेव्हा राजा मोहम्मद सहावा यांचे वडील हसन द्वितीय यांनीही अशीच विनंती केली होती.
हेही वाचा - Reciprocal Tariffs : ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणामुळे भारतीय निर्यातदारांचे 700 कोटींचे नुकसान होणार?
53% कमी पाऊस, जनावरांसाठी चाऱ्याची समस्या
या वर्षी मोरोक्कोमध्ये गेल्या 30 वर्षांच्या तुलनेत तब्बल 53 टक्क्यांनी कमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे गुरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त, मांस उत्पादन कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत आणि जिवंत प्राणी, मेंढ्या आणि लाल मांसाची आयात वाढली आहे.
अलीकडच्या एका मुलाखतीत, मोरोक्कोचे कृषी मंत्री अहमद बोआरी म्हणाले की, पिण्याचे पाणी आणि उद्योग यासारख्या प्राथमिक क्षेत्रांसाठी पाणी आवश्यक आहे आणि याचा शेतीवर परिणाम झाला आहे. अनेक सिंचित क्षेत्रांमध्ये कडक नियम आणि पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
मोरोक्कोमध्ये मांसाचे भाव गगनाला भिडत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मांसाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी मोरोक्कन सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या, उंट आणि लाल मांसावरील आयात शुल्क आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द केला आहे. जूनमध्ये येणारा ईद-उल-अजहा हा सण अल्लाहच्या आदेशानुसार पैगंबर इब्राहिम यांच्या पुत्राच्या कुर्बानीचे स्मरण म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा - दारुड्या माकडांबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? त्यांचं 'सोशल ड्रिंकिंग'ही असतं आणि जास्त ढोसली तर त्यांनाही होतो 'हँगओव्हर'!