Prajakta Gaikwad Reception Entry : नंदीवरील एन्ट्रीवरून प्राजक्ता अडकली ट्रोलिंगच्या कचाट्यात! प्रसिद्ध ज्योतिषाने स्पष्ट केलं लॉजिक

प्राजक्ता गायकवाडचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्या दरम्यान प्राजक्ता रिसेप्शनच्या एन्ट्रीवरून ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली.

Prajakta Gaikwad Reception Entry : नंदीवरील एन्ट्रीवरून प्राजक्ता अडकली ट्रोलिंगच्या कचाट्यात! प्रसिद्ध ज्योतिषाने स्पष्ट केलं लॉजिक

नुकतीच लग्न झालेली मराठी इन्डस्ट्रीतील नवी नवरी प्राजक्ता गायकवाडचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्या दरम्यान प्राजक्ता रिसेप्शनच्या एन्ट्रीवरून ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली. प्राजक्ता आणि तिचा नवरा शंभुराज या दोघांनी त्यांच्या रिसेप्शनमधील एन्ट्रीसाठी एका भल्या मोठ्या नंदीचा वापर केला होता. त्या मोठ्या नंदीच्या पाठीवर बसून दोघांनी राजेशाही एन्ट्री केली होती. त्यावेळेस प्राजक्ता शंभुराजच्या पुढे बसली होती, तर शंभुराज तिच्या मागे बसला होता. मात्र तिला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगचं मुख्य कारण होत ते म्हणजे, नंदीवर बसलेल्या प्राजक्ता आणि शंभुराजच्या समोर भगवान शंकराचं गाणं वाजत होत. तिला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी प्रतिक्रिया देत प्राजक्ता आणि शंभुराजने केलेली एन्ट्री चुकीची नसल्याचं म्हटलं आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी प्राजक्ताचं कन्यादान केल होत. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्या एन्ट्री मागचं खरं लॉजिक सांगितल आहे. 

हेही वाचा- Mahima Chaudhary Wedding Viral Video : हातात फुलमाळा अन् चेहऱ्यावर स्मित हास्य! 52 वर्षांच्या महिमा चौधरीचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल….

त्याच ज्योतिषी आनंद पिंपळकर म्हणाले की, “दोन दिवसांपुर्वी लाडकी अभिनेत्रीचं प्राजक्ता गायकवाडचा विवाह संपन्न झाला. यावेळी विवाहापूर्वी एक देखावा सादर केला. ज्यात नवरा आणि नवरी मोठ्या नंदीवरून बसून मंडपात आले. यावेळी शिवगणांचा धार्मिक देखावा साजरा करण्यात आला. शिव त्यांच्या गणांसहित मिरवणूकीत सहभागी झाले होते. शिवगणांमध्ये जनावर, भूतं खेतं होती. अशाच प्रकारचा देखावा करून काही कलाकार या देखाव्यात सामील झाले होते. हे पाहून बऱ्याच मंडळींना राग आहे. हे चुकीचं आहे, नवरा नवरी नंदीवर बसलेत आणि महादेव त्यांच्यासमोर नाचत आहे हे बरोबर नाही. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही कारण जो पर्यंत माहिती नसते तेव्हा आपलं मत असणं, चुकीचं वाटणं सहाजिक आहे. कारण प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. पण काही वेळा सोशल मीडियामध्ये कोणतीही माहिती न घेता ट्रोलिंग केलं जातं. एकाने री ओढली की दुसरे त्यामागून बोलतो.”

हेही वाचा- Rinku Rajguru : ‘आशा’ पुसणार ‘आर्ची’ची इमेज? रिंकू राजगुरूच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

“हा देखावा सादर केला होता यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं. तुम्हाला असं वाटेल मी याच खंडण का करतोय? पण मी पुराव्यासोबत तुम्हाला सांगणार आहे. याचं कारण असं की धर्मशास्त्रानुसार, लग्नाचा मंडप असतो जिथे विवाह विधी होतात तिथे मंडप बंधन होतं. ज्या जोडप्याचं लग्न होतं ते नर आणि नारी न राहता साक्षात लक्ष्मी आणि विष्णू स्वरूपात त्यांचं अस्तित्व निर्माण होतं. किंवा त्यांना त्या स्वरूपात पाहायला पाहिजे असं धर्मशास्त्राने सांगितलं आहे. मी लहान होतो तेव्हा मी पाहिलंय, बरेच लोक नवरा नवरीच्या पाया पडतात. विवाह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विष्णू लक्ष्मीचा संयोग आहे. आपल्या अपस्तंभ ग्रहांमध्ये असं विधान आहे पती विष्णू, पत्नी लक्ष्मी. म्हणजे पती हे विष्णूचं आणि पत्नी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. ज्यावेळी विवाह मंत्र म्हटले जातात, वधू वराला संबोधित करताना असं स्पष्ट म्हटलं जातं की, ‘त्वम लक्ष्मीरसी, अयम विष्णूरसी.’ नवरा नवरी नर नारी न राहता हे साक्षात विष्णू आणि लक्ष्मी आहेत”.

हेही वाचा- Raj Nidimoru Ex-wife Emotional Post : ‘तुम्हाला ड्रामा हवा असेल तर…’; समंथासोबतच्या लग्नानंतर राज निदिमोरूच्या पहिल्या पत्नीची भावनिक पोस्ट

“आता त्यात तुम्ही म्हणाल की, याचा काय संबंध? तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळी विष्णी लक्ष्मीचा विवाह झाला त्यावेळेस शंकराने त्यांच्या गणांसहीत प्रत्यक्ष सहभाग घेतला याचा विविध पुरणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पद्म पुराणाच्या पाताळ खंडामध्ये एक स्पष्ट श्लोक आहे. त्यामध्ये असं म्हणटलं की, ‘तत्रा गच्छन सुराहासा,सर्वे ब्रम्हा लोकप्रितामा रुद्रोपि भगवान शरवहा, गणेश्वर समन्विता’ याचाच अर्थ असा आहे की, सर्व देवता, ब्रम्हदेव, आणि शंकर आपल्या गणांसह तिथे उपस्थित होते. ते मध्यभागी उपस्थित होते आणि त्यांनी नृत्य देखील केलं. म्हणूनच आज विवाहात नंदी, शिवगण, शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नाही. धर्माचा किंवा देवी देवतांचा अपमान नाही. तर तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन पुराण परंपरेचं मूर्त स्वरूप आपल्या समोर आणायचा हा यामागचा हेतू आहे.” पिंपळकर यांनी पुढे सांगितलं, “विवाह होतो तेव्हा ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, त्यात असं म्हटलं जात की, शंकरोपी प्रमुदितो देवगुण समन्वितां, लक्ष्मी नारायणस्य दिव्य विवाह मुपागत.. शंकर अत्यंत आनंदाने देवगणांसहीत लक्ष्मी नारायणाच्या दिव्य विवाहाला आता आले आहेत. ते विवाह विधी जे देव स्थापन केले जातात त्यात सर्वात पहिले रुद्राचं म्हणजे शिवाचं स्थान मांडलं जातं, मानलं जातं आणि पूजलं जातं.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number