Maha Khumbh Mela 2025: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अनेक अभिनेता अभिनेत्री शाहीस्नानसाठी जातांना पाहायला मिळताय. अशातच आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रयागराजमधील महाकुंभात पोह्चल्याच पाहायला मिळतंय. प्राजक्ताने आताच महाकुंभ मेळ्यात जाऊन पवित्र स्नान केल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या सोशल मिडिया अकॉउंटवर व्हिडिओ पोस्ट केलाय.
हेही वाचा: संदीप देशपांडेची अजित पवारांवर टीका
काय आहे पोस्ट?
“तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोचले.)” असं कॅप्शन देत प्राजक्ता माळीने व्हिडिओ पोस्ट केलाय.
महाकुंभ मेळा 2025 हे खगोलशास्त्रीय गणनेनुसार अद्वितीय आहे. या मेळ्याचे नक्षत्र संरेखन दर 144 वर्षांनी एकदा होते. त्यामुळे, गेल्या 144 वर्षांतील सर्व महाकुंभांपैकी 2025 चा महाकुंभ सर्वात शुभ आहे.
हेही वाचा: मुंबई लाईफलाईनचं रूप बदलणार
महाकुंभ मेळा 2025 चे वैशिष्ट्ये:
हा मेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आला होता.
हा मेळा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पार पडला होता.
या मेळ्यात कोट्यवधी भाविकांनी सहभाग घेतला होता.
या मेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमात स्नान करण्यात आले होते.
कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा मेळा आहे. हा मेळा भारतातील चार प्रमुख स्थानांमध्ये भरतो. ही चार स्थाने म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन.