Friday, July 11, 2025 11:32:49 PM

कारागृह वाईट होता की बिग बॉस?; फराह खानच्या प्रश्नावर मुनावर फारुकी म्हणाला...

कोरिओग्राफर फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. अलिकडेच कॉमेडियन मुनावर फारुकी तिच्या घरी आला होता.

कारागृह वाईट होता की बिग बॉस फराह खानच्या प्रश्नावर मुनावर फारुकी म्हणाला

मुंबई: चित्रपट दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. यात फराह अनेक सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि सर्वजण एकत्र स्वयंपाक बनवतात. अलिकडेच कॉमेडियन मुनावर फारुकी तिच्या घरी आला होता. यावेळी फराहने मुनावरशी बिग बॉसपासून त्याच्या लग्नापर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली. याशिवाय, फराहने मुनावरसोबत तुरुंगात जाण्याबद्दलही चर्चा केली. यावर मुनावर म्हणाला, 'जेल आणि बिग बॉसची तुलना होऊ शकत नाही'.

हेही वाचा: जिम कॉर्बेट असो किंवा रणथंबोर; भारतातील 'हे' राष्ट्रीय उद्याने पावसाळ्यात बंद का राहतात?

कारागृह जास्त वाईट होतं की बिग बॉस?

तणावाची चर्चा सुरू होताच, फराह मुनव्वरला विचारते की, 'तुरुंग वाईट होतं की बिग बॉस?'. यावर मुनावर म्हणाला की, 'बिग बॉस आणि तुरुंगाची तुलना होऊ शकत नाही. पण हो, बिग बॉसमध्ये तुरुंगापेक्षा जास्त त्रासदायक लोक होते'. यानंतर फराहने सांगितले की, 'मुनावर बिग बॉसमध्ये जाण्याच्या एक महिन्यापूर्वी आपली भेट झाली होती'. त्यानंतर मुनावरने फराहला सांगितले होते की, 'मी बिग बॉसमध्ये जाणार आहे आणि मी शो जिंकल्यानंतरच परत येईल'.

मुनावरला तुरुंगात कधी पाठवलं होतं?

जानेवारी 2021 मध्ये मुनावर फारुकीला तुरुंगात जावे लागले होते. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मुनावर एक कार्यक्रम करत होता. तेव्हा, मुनावरने वादग्रस्त वक्तव्य केलं, ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. मुनावर विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक केलं. पोलिसांनी सांगितले की, 'स्थानिक भाजप आमदार मालिनी लक्ष्मण सिंग गौर यांचा मुलगा एकलव्य सिंग गौर याने तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे फारुकी आणि इतर चार जणांना अटक करण्यात आली'. गौड आणि त्याचे साथीदार प्रेक्षक म्हणून कार्यक्रमात गेले होते, जिथे त्यांनी धार्मिक भाष्यांना आक्षेप घेतला आणि गोंधळ निर्माण केला. सुमारे 37 दिवस मुनावर फारुकी तुरुंगात होता. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.


सम्बन्धित सामग्री