पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालच्या नात्यात पुन्हा प्रेम फुलणार! ब्रेकअपनंतर आकृतीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल यांच्यातील मतभेद मिटले असून दोघांनी पॅचअप केल्याची चर्चा आहे.
पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालच्या नात्यात पुन्हा प्रेम फुलणार! ब्रेकअपनंतर आकृतीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल यांच्यातील मतभेद मिटले असून दोघांनी पॅचअप केल्याची चर्चा आहे. महिन्याभरापूर्वी साखरपुडा मोडल्यानंतर आता दोघे एकत्र आल्याने आकृतीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नात्याची कबुली दिली आहे.

या बातमीमुळे चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. कारण पृथ्वी आणि आकृती यांनी याच वर्षी मार्च महिन्यात साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. मात्र सहा महिन्यांतच सप्टेंबरमध्ये आकृतीने ब्रेकअपची पोस्ट शेअर केली. उद्दिष्ट आणि परिस्थितीतील तफावत हे वेगळं होण्यामागचं कारण असल्याचं तिने म्हटलं होतं आणि हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे सांगत तर्क-वितर्क टाळण्याची विनंतीही केली होती.

ब्रेकअपपूर्वी जुलैमध्ये आकृतीने फसवणुकीबाबत एक पोस्ट शेअर केल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र नंतर तिने स्पष्ट केले होते की, ती पोस्ट पृथ्वी शॉसाठी नव्हती आणि ती त्याच्यासोबत आनंदी आहे.

आकृतीची नेमकी पोस्ट काय?

एक वैयक्तिक स्पष्टीकरण – “जेव्हा मी आमचा साखरपुडा मोडला, तेव्हा माझ्या जवळच्या लोकांच्या मतांचा प्रभाव माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे आणि आमच्या नात्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर पडला. ज्यांना आमचं नातं आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहित आहे, असं मला वाटत होतं. मला वाटतं माझी दिशाभूल झाली होती आणि आम्हाला मिळायला हवी असलेली प्रामाणिक चर्चा न करताच मी एक निर्णय घेतला.

हेही वाचा – नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

मी त्या निर्णयाची आणि त्यामुळे झालेल्या त्रासाची जबाबदारी स्वीकारते. तेव्हापासून आम्ही मनमोकळेपणाने बोललो, एकमेकांना समजून घेतले आणि पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत आणि आम्हाला इतर कोणाचीही गरज नाही. यावेळी आम्ही आमच्या स्वतःच्या समजुतीने, विश्वासाने आणि प्रेमाने मार्गदर्शन घ्यावे, अशी माझी इच्छा आहे. आम्ही पुन्हा सुरुवात करत असताना, कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.”

हेही वाचा – बिग बॉसच्या घरात ट्विस्ट! 5 आठवड्यांनंतर अखेर सलमान खानने सदस्यांना दिला ‘तो’ मोठा धक्का, नेमकं काय होणार?

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version