पुणे हादरले! मस्ती करतो म्हणून 3 वर्षाच्या चिमुकल्याला घेतलं अन् बाथरुममध्ये….; CCTV पाहून पालक थरथरले

Pune Crime News : पुणे शहरातून अतिशय धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याआधी पुण्यात घडलेला हा प्रकार नक्की वाचा. जाणून घ्या नक्की शाळेत घडलं काय?

पुणे हादरले! मस्ती करतो म्हणून 3 वर्षाच्या चिमुकल्याला घेतलं अन् बाथरुममध्ये….; CCTV पाहून पालक थरथरले
Pune school shocking incident

पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे. वर्गात मस्ती करतो करतो या कारणावरुन अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला शिक्षिकेने चक्क बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील एका नामांकित शाळेत घडलेला आहे. या प्रकरणी शिक्षिका मनिता बेदी आणि व्यवस्थापिका सोनाली देशमुख यांच्याविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नेमकं त्या दिवशी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना 8 सप्टेंबर रोजी घडलेली होती. मात्र, त्यानंतर तब्बल 1 महिन्याने 11 ऑक्टोबर रोजी संबंधित चिमुकल्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. 8 सप्टेंबर रोजी चिमुकला नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. साधारण दुपारी सव्वा दोन वाजता शाळा सुटल्यानंतर त्याला घेण्यासाठी त्याची आई शाळेत गेली होती. नेमकं त्यावेळी शिक्षिकेने मुलाने वर्गात खूप मस्ती केल्यामुळे त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले आहे, असे सांगितले.

हेही वाचा-सिगारेटचे चटके, मारहाण…; प्रेयसीकडूनच प्रियकराचा अमानुष छळ; इमारतीवर नेलं अन् पुढे जे घडलं ते हादरवणारं

मात्र, घाबरलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याने रडत-रडत आपल्या आईला सांगितले की, शिक्षिकेने त्याला खोलीत नव्हते तर शाळेतील एका बाथरुममध्ये बंद करुन ठेवले होते.

सीसीटीव्ही फुडेट पाहताच…
मुलाने सांगितल्याने आईने संबंधित शिक्षिकेला विचारले असता, मुलगा खूप मस्ती करत होता आणि दुसरीकडे जागा कुठे नसल्याने काहीच वेळासाठी त्याला बाथरुममध्ये बंद केल्याची कबुली शिक्षिकेने दिली. पण पालकांनी थोडी शंका आल्याने, त्यांनी शाळेकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र, व्यवस्थापिकेने बरीच कारण देत फुटेज देण्यास टाळाटाळ केली. अखेर 21 सप्टेंबरला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं त्यानंतर बाथरूम मध्ये कोंडून ठेवताना शिक्षिका दिसत असल्याचा दावा देखील पालकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number