Reason behind Samantha's weight loss: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या आरोग्याशी संबंधित आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ‘व्होग ब्युटी अँड वेलनेस ऑनर्स’ कार्यक्रमात समांथाने तपकिरी रंगाच्या कट-आउट ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण तिच्या वजनात झालेल्या अचानक घटेमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
खरं तर, 2024 मध्ये समांथानेच एक भावनिक पोस्ट करत सांगितलं होतं की तिला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार झाला आहे. हा आजार शरीराच्या स्नायूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे ती अत्यंत कठोर अँटी-इंफ्लेमेटरी डाएट फॉलो करत आहे. तिच्या या डाएटमुळेच ती सध्या खूपच बारीक दिसतेय.
समांथाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्पष्ट संदेश देत सांगितलं, माझं वजन कमी होण्यामागे सौंदर्याचा हट्ट नाही तर आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेला डाएट आहे. कृपया लोकांनी जज करणे थांबवा आणि लोकांना आयुष्य जगू द्या.
अँटी-इंफ्लेमेटरी डाएट म्हणजे काय?
अँटी-इंफ्लेमेटरी डाएट म्हणजे असा आहार जो शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतो. या डाएटमध्ये प्रक्रिया केलेले अन्न टाळावे लागते जसे की सॉसेज, बिस्किट्स, फास्ट फूड, रेडीमेड जेवण, मिठाई, शिजवलेले मांस, साखरयुक्त पेये आणि रिफाइंड पिठाचे पदार्थ. यातील साखर, सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज शरीरात सूज वाढवतात आणि त्यामुळे अनेक गंभीर आजारांची शक्यता वाढते.
हेही वाचा: महत्वाची बातमी: 1 जूनपासून यूपीआय ते एलपीजीपर्यंत आर्थिक व्यवस्थेत होणार मोठे बदल; काय आहे नवीन नियमावली? जाणून घ्या
कोणते अन्न पदार्थ टाळावेत?
पांढरी ब्रेड, पॉलिश तांदूळ, पिठाचे पास्ता
साखरयुक्त ड्रिंक्स (सोडा, पॅक केलेले फळांचे रस)
कुकीज, केक, पेस्ट्रीज
बटर, चीज, फुल-फॅट आइस्क्रीम
प्रक्रिया केलेले मांस (बेकन, हॅम, पेपरोनी)
समांथाचं धाडस आणि सकारात्मकता
समांथाची ही कहाणी केवळ आरोग्याच्या समस्यांची नव्हे, तर त्या समस्यांवर मात करण्याच्या तिच्या दृढनिश्चयाची आहे. अनेक जण तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत, पण तिने स्वतःच्या प्रकृतीला प्राधान्य दिलंय. तिचं धैर्य, पारदर्शकता आणि ‘जज न करता जगू द्या’ हा संदेश समाजासाठी एक प्रेरणा आहे.
आजच्या काळात सौंदर्याच्या मापदंडांपेक्षा आरोग्य आणि मानसिक शांती अधिक महत्त्वाची आहे. समांथाने हे आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे.