वाढदिवसाच्या मध्यरात्री मन्नतवर शाहरुख खानची अनुपस्थिती; पण, हाताने लिहिलेल्या ‘त्या’ संदेशाने जिंकली चाहत्यांची मनं

आपल्या लाडक्या चाहत्यांची निराशा होऊ नये म्हणून त्याने एक अनोखा मार्ग अवलंबला. घराबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी एका मोठ्या प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला

वाढदिवसाच्या मध्यरात्री मन्नतवर शाहरुख खानची अनुपस्थिती; पण, हाताने लिहिलेल्या ‘त्या’ संदेशाने जिंकली चाहत्यांची मनं
Shah Rukh Khan

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने यंदा आपला जन्मदिवस अत्यंत खास अंदाजात साजरा केला. नेहमीप्रमाणे यंदाच्या वाढदिवसाच्या मध्यरात्री तो आपल्या प्रसिद्ध ‘मन्नत’ बंगल्याच्या बाल्कनीमध्ये येऊन चाहत्यांना भेटू शकला नाही. परंतु, आपल्या लाडक्या चाहत्यांची निराशा होऊ नये म्हणून त्याने एक अनोखा मार्ग अवलंबला. घराबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी एका मोठ्या प्रोजेक्टरचा वापर करण्यात आला, ज्यावर शाहरुखच्या हस्ताक्षरातील एक खास संदेश प्रदर्शित करण्यात आला.

चाहत्यांसाठी लिहिला भावूक संदेश

सोमवारी 61 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानच्या घराबाहेर मध्यरात्रीपासूनच चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती. चाहत्यांच्या या अफाट प्रेमाचा स्वीकार करत शाहरुखने प्रोजेक्टरच्या माध्यमातून एक भावनिक संदेश दिला. या हस्तलिखित चिठ्ठीत त्याने लिहिले होते, “तुमच्या भरभरून शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम आणि एक घट्ट मिठी.” या एकाच संदेशाने उपस्थित सर्व चाहत्यांचा उत्साह कैक पटीने वाढवला आणि ‘मन्नत’बाहेरचा परिसर एखाद्या उत्सवासारखा दुमदुमून गेला.

‘किंग’ चित्रपटातील संवादांची आणि दृश्यांची प्रेक्षकांना मिळाली झलक

या विशेष मध्यरात्रीच्या सेलिब्रेशनमध्ये केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छाच नव्हे, तर शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलकही पाहायला मिळाली. मोठ्या पडद्यावर चित्रपटातील काही खास ॲक्शन दृश्ये आणि दमदार संवाद झळकले. विशेषतः “किंग अकेला काफी है” आणि “डर नहीं, दहशत हूँ” हे संवाद चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या सगळ्या अनोख्या आयोजनामुळे चाहत्यांना वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसोबतच आगामी चित्रपटाची एक अप्रतिम मेजवानी मिळाली.

हेही वाचा – झोपेतचं मृत्यूनं गाठलं! लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याचं 33 व्या वर्षी निधन; मृत्यूमागचं धक्कादायक कारण समोर

ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुप्रतिक्षित ‘किंग’

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला ‘किंग’ हा ॲक्शन-पॅक मनोरंजक चित्रपट येत्या 24 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने ‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान पहिल्यांदाच आपली लाडकी मुलगी सुहाना खान हिच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number