बाहुबलीनंतर बिगबजेट रामायण चित्रपटातील रावणाला दिलाय आवाज! मराठमोळा अभिनेता शरद केळकर चर्चेत

मराठमोळ्या अभिनेत्याची कमाल! बाहुबलीनंतर आता रामायणातील रावणाला आवाज देणार 

बाहुबलीनंतर बिगबजेट रामायण चित्रपटातील रावणाला दिलाय आवाज! मराठमोळा अभिनेता शरद केळकर चर्चेत

मराठमोळा अभिनेता ज्याने अभिनयाबरोबरच डबिंग क्षेत्रही गाजवले आहे. हा दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता शरद केळकर आहे. बाहुबलीच्या दोन्ही भागांमध्ये प्रभासला दिलेल्या आवाजानंतर आता तो बिग बजेट असलेल्या ‘रामायण’ चित्रपटातील रावणाला आवाज देणार असल्याची माहिती समोर आली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, दाक्षिणात्य सुपरस्टार साई पल्लवी आणि KGF स्टार यश अभिनित ‘रामायण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच मोठ्या प्रमाणावर प्रमोशन सुरू असून, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यातील रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशसाठी अभिनेता शरद केळकरने हिंदीमध्ये आवाज दिला आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Pardeep Goyat (@pardeepgoyat007)

डबिंग आर्टिस्ट शरदची प्रमुख कामे-

याआधी शरद केळकरने ब्लॉकबस्टर ठरलेल्या प्रभासच्या ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांसाठी हिंदी आवाज दिला होता. याशिवाय प्रभासच्या ‘सालार’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांसाठीही त्याने हिंदी डबिंग केले आहे. तसेच नानीच्या ‘दसरा’ आणि राम चरणच्या ‘विनया विधेया रामा’ या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्यांमध्येही त्याचा आवाज ऐकायला मिळाला. हॉलिवूडच्या ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘फ्युरियस ७’ आणि ‘xXx: रिटर्न ऑफ झँडर केज’ यांसारख्या चित्रपटांच्या हिंदी डबिंगमध्येही त्याने योगदान दिले आहे.

हेही वाचा – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री विवाहबंधनात; लग्नाचे फोटो व्हायरल, ओळखलं का?

त्याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत ‘रामायण’मधील रावणाच्या आवाजाची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याचा दमदार आवाज आणि यश यांच्या अभिनयाची उत्तम जोड पाहायला मिळणार असून चाहत्यांनी त्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड अभिनेत्यांबरोबरच मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे हा भरताची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य देव विश्वामित्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

अभिनेता म्हणून केलेली उल्लेखनीय कामे

अभिनयाच्या क्षेत्रातही शरदने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर मराठीतील ‘हर हर महादेव’ मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली. याशिवाय ‘लई भारी’, ‘राक्षस’ आणि ‘रांटी’ यांसारख्या मराठी चित्रपटांतही त्याने काम केले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘हाऊसफुल 4’, ‘ऑपरेशन रोमिओ’ आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका उल्लेखनीय आहेत.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number