मुलांच्या भांडणाचा भयंकर शेवट! जावेने दीराच्या गुप्तांगासोबत…,तब्बल 55 टाके घालण्याची वेळ; घडलं काय?

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुलांच्या भांडणातून कुटुंबातील मोठ्यांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून, प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मुलांच्या भांडणाचा भयंकर शेवट! जावेने दीराच्या गुप्तांगासोबत…,तब्बल 55 टाके घालण्याची वेळ; घडलं काय?
Crime News

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका किरकोळ कारणावरुन घडलेल्या क्षुल्लक वादाने अतिशय हिंसक वळण घेतले. फक्त मुलांच्या भांडणातून मोठ्यां व्यक्तीमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये महिलेने आपल्या दीराच्या गुप्तांगाला दाताने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ही संपूर्ण घटना सजेती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुराऊपूर या गावात घडली आहे.

मुलांच्या वादातून कुटुंबात तुफान राडा
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या भावाच्या मुलाचा कुटुंबातीलच इतर मुलांशी भांडण झाले होते. याच कारणावरुन तरुणाने मुलाला मारहाण केली आणि त्याच्या पत्नीनही त्या मुलाला फटकारले होते. त्यानंतर मुलाने आपल्या घरी जात सर्व प्रकार आईला सांगितला. मुलाने सांगिलेल्या प्रकाराने महिला संतापली आणि भांडण्यासाठी दीराच्या घरी गेली. वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले आणि याचवेळी महिलेने आपल्याच दीराच्या गुप्तांगाला चावा घेतला, असा आरोप केला जात आहे.

हेही वाचा- अक्षता पडण्याआधीच लग्नमंडपात थरार! प्रेमविवाहावरून पेट्रोल टाकून….;महाराष्ट्र हादरला

पुढे काय घडलं?
महिलेच्या हल्ल्यात दीर गंभीर जखमी झालेला आहे. जखमी तरुणाला सुरुवातीस घाटमपूरच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलेले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने कानपूरच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्याला तब्बल 55 टाके घालावे लागले. या संपूर्ण प्रकरमी जखमीच्या पत्नीने जावे विरोधात तक्रार दिली असून तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number