कर्जत येथील झाडांच्या कत्तलीवरुन सध्या सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. याला फेक नरेटिव्ह शिवाय काहीच म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. पंप स्टोरेज म्हणजे हायडल पॉवर ही क्लीन आणि स्वच्छ ऊर्जा आहे. प्रदूषण न करणारी ऊर्जा असणार आहे. आपण मोठ्या प्रमाणात सोलर क्षमता तयार केली आहे. मात्र, पीक अवर सोलर नंतर असतो. त्या चार तासांच्या पिकसाठी कोळशाची वीज वापरली तर मोठे प्रदुषण होईल.
याच कारणामुळे हा पंप स्टोरेजच्या माध्यमातून तब्बल 3000 मेगावॅट क्लीन एनर्जी ही वापरण्याचा प्रकल्प आहे. कंपनीने तिप्पट जागा ही वन विभागाला दिलेली असून तिथे 90 हजार झाडे लावली जाणार आहेत. 3000 मेगावॅट वीज कोळशातून तयार केली तर तब्बल 28 कोची झाले लावाली लागणार आहेत. तर 40 लाख वाहनांइतके प्रदुषण होईल आणि चार लाख लोकांना पुरेल इतके पाणी लागणार आहे, हे आपण वाचवत आहोत. या पर्यावरण पूरक हा प्रकल्प असून गुंतवणूक आणि रोजगार महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे. यावर खोटा नरेटिव्ह पसरवणे हे महाराष्ट्र विरोधी काम आहे.