Tuesday, February 17, 2026 08:42:43 PM

Shashank Ketkar Thane Video : "ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या मागे..." मतदान केल्यानंतर शशांकने दाखवली ठाण्यातील खरी परिस्थिती

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात ठाण्यातील एका शाळेबाहेरील दुर्दैवी परिस्थिती दाखवली आहे.

shashank ketkar thane video  quotज्या शाळेत मतदान केलं त्या शाळेच्या मागेquot मतदान केल्यानंतर शशांकने दाखवली ठाण्यातील खरी परिस्थिती

महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी आज गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. यावेळी 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडत आहे. यावेळी मतदानाचा लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. अशातच आज सकाळीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या मतदानासाठी सामान्य जनतेसोबतच सेलिब्रिटी देखील मतदानासाठी घराबाहेर पडले असून मतदान केंद्रावर पोहोचले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेलिब्रिटी सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करत आहेत. तसेच मतदानाचा हक्क बजावून ते त्यांच्या पुढच्या कामाला देखील निघाले आहेत. 

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika : दोन पक्ष, एक उमेदवार! काँग्रेसच्या उमेदवाराला 'वंचितच'ही तिकीट, इम्तियाज जलील यांचा आयोगाला सवाल
अशातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात ठाण्यातील एका शाळेबाहेरील दुर्दैवी परिस्थिती दाखवली आहे. अभिनेता शशांक केतकर याने देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी तो ठाण्यातील एका शाळेत मतदान करण्यासाठी गेला होता. मतदान करून तो बाहेर आला आणि शाळेच्या मागच्या आवारात गेला, त्यावेळेस त्याने तेथील पडलेला कचऱ्याचा ढीग थेट सोशल मीडियावर व्हिडीओ करत दाखवला. विशेष म्हणजे ज्या शाळेच्या मागे हा कचऱ्याचा ढीग होता ती शाळा एक आंतरराष्ट्रीय शाळा आहे.

हेही वाचा- BMC Election 2026 : मुंबईत पहिला दुबार मतदार मनसेच्या कचाट्यात सापडला! वार्ड क्रमांक 192 मध्ये नेमकं काय घडलं?

शशांक केतकरने म्हटलं आहे की, "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या exact बाहेर ही अवस्था आहे . उद्या कोणत्याही पार्टीतला कोणीही निवडून आला तरी ‘ स्वच्छता ‘ या मूलभूत गोष्टीसाठी कोणीही पुढाकार घेणार नाही आणि नागरीक सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देणार नाहीत याची खात्री आहे. ही माझ्या मनातली उदासीनता, नकारात्मकता नाहीये … वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय शाळा आहे ही ठाण्यातली त्या शाळेच्या दारात ही अवस्था आहे!" प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर मंदार देवस्थळी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आहे. त्यात त्याने केलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नागरिकांनी त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. तसेच सरकारच्या कामावर आणि ठाणे महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 


सम्बन्धित सामग्री