Sunday, February 15, 2026 06:55:57 AM

BMC Election 2026 : मुंबईत पहिला दुबार मतदार मनसेच्या कचाट्यात सापडला, वार्ड क्रमांक 192 मध्ये नेमकं काय घडलं?

आज मतदान पार पडत असून उद्या म्हणजेच 16 जानेवारीला मुंबईसह 29 महानगरपालिकांचा कौल लागणार आहे. अशातच दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्येमधून मोठी बातमी समोर येत आहे.

bmc election 2026  मुंबईत पहिला दुबार मतदार मनसेच्या कचाट्यात सापडला वार्ड क्रमांक 192 मध्ये नेमकं काय घडलं

आज मतदान पार पडत असून उद्या म्हणजेच 16 जानेवारीला मुंबईसह 29 महानगरपालिकांचा कौल लागणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईत एकूण 10 हजार 231 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून प्रशासनाने 64 हजार 375 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

हेही वाचा- Maharashtra Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे EVM मशीनमध्ये घोळ...
महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी आज गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. यावेळी 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडत आहे. यावेळी मतदानाचा लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. अशातच दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्येमधून मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांच्या वेळी अनेक दुबार मतदान झाले असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.

हेही वाचा- Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज मतदानाचा महासंग्राम! 29 महापालिकांसाठी आज मतदान; उमेदवारांची संख्या थक्क करणारी

त्यानंतर त्यांनी महापालिकांच्या निवडणुकीच्या आधीच मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दुबार मतदार दिसला, तर त्याला तिथेच फोडून टाका असे आदेश दिले होते. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिला दुबार मतदार मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या कचाट्यात सापडला आहे. वार्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात लढत होणार आहे. मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर त्यांनी दुबार मतदाराला पकडले आहे. दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराचा आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून दिले. 


सम्बन्धित सामग्री