महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी आज गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. यावेळी 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडत आहे. यावेळी मतदानाचा लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे. शहरात एकूण 1563 मतदान केंद्रांवर मतदारांचा कौल लागणार असून 266 मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील येथे विशेष पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
मतदारांमध्ये 6 लाख 56 हजार 675 महिला मतदार तर 7 लाख 3 हजार 968 पुरुष मतदारांचा समावेश असून 79 तृतीयपंथीय मतदार देखील मतदान करणार आहेत. मतदानासाठी 4860 बॅलेट युनिट्स आणि 1800 कंट्रोल युनिट्स सज्ज झाले आहे. तसेच 31 प्रभागांत 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात उतरले आहेत, यामध्ये 527 राजकीय पक्षांचे उमेदवार आणि 208 अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राज्यभर महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाची रंगत रंगली असताना मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड झाला आहे.
प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 8 मध्ये मतदानाला अद्याप सुरुवात नाही. EVM मध्ये बिघाड झाल्यानं अद्याप मतदानाला सुरुवात नाही. तर नवीन नाशिक मधील प्रभाग 29 च्या खोली क्रमांक 2 मतदान केंद्र 18 मध्ये evm मशीन बंद पडले असून मॉक पोल नंतर मशीनमध्ये error दाखवत आहे. त्याचसोबत छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 3 बेगमपुरा येथील ज्ञानेश्वर विद्यालय येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. एवढचं नव्हे तर तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद पडले असून योग्य व्यवस्था नसल्याबाबत उमेदवार प्रतिनिधींनी आणि मतदारांनी नाराजी व्यक्त केली.