Purna Aaji Entry : छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुन या मुख्य पात्रांसोबतच पूर्णा आजी हे पात्रही खूप गाजले. अभिनेत्री तेजस्वी पंडितची आई आणि दिवंगत अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी ही भूमिका साकारली होती आणि अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर चाहते हळहळले होते आणि 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका पुढे कोण साकारणार, पूर्णा आजी पुन्हा मालिकेत दिसणार का, असे प्रश्न चाहत्यांना पडले होते.
आता ‘ठरलं तर मग’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदीची बातमी आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत नव्या पूर्णा आजींची एन्ट्री झाली आहे. नुकताच या एन्ट्रीचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सुभेदारांच्या घरी नव्या पूर्णा आजी दमदार एन्ट्री घेताना दिसत आहेत, ज्यामुळे मालिकेतील कलाकारही खूप खूश झाले आहेत. आता हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारत आहेत.
हेही वाचा - Nikitin Dheer: वडील पंकज धीर यांच्या निधनानंतर निकितिनची पहिली पोस्ट समोर, मृत्यूबद्दल काय सांगितलं?
हा प्रोमो पाहून चाहत्यांनी नवीन पूर्णा आजींच्या भूमिकेतील अभिनेत्रीचा अंदाज लावला होता. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे नाव घेतले आहे. एका चाहत्याने "रोहिणी हट्टंगडी" अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने "होणार सून मी ह्या घरची मधली आजी" अशी आठवण करून दिली. विशेष म्हणजे, एका चाहत्याने "अंगावर काटा आला, असं वाटलं जुनी पूर्णा आजी आली" अशी भावना व्यक्त केली. आता या चाहत्यांचा बरोबर ठरल्याची खात्री पटली आहे.
एकंदरीत, नव्या पूर्णा आजींना पाहण्यासाठी प्रेक्षक आणि चाहते प्रचंड उत्सुक आहेत. त्यांच्या एन्ट्रीने मालिकेच्या कथानकाला कोणतं नवं वळण मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - Rishab Shetty In KBC : 'बिग बीं'चा तो आयकॉनिक डायलॉग, ऋषभ शेट्टीचा डॅशिंग 'Rajini Walk'; KBC च्या या एपिसोडची सर्वत्र चर्चा