Sunday, November 16, 2025 06:05:42 PM

The Family Man Season 3 : प्रतिक्षा संपली ! मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन सीझन 3' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, टिझर समोर

श्रीकांत तिवारी या भूमिकेतील मनोज वाजपेयीच्या या सिरीजने मागील दोन सिझन्समध्ये एक खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. आता प्रेक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे.

the family man season 3  प्रतिक्षा संपली   मनोज वाजपेयीचा द फॅमिली मॅन सीझन 3 या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला टिझर समोर

The Family Man Season 3 : ओटीटीवरची प्रेक्षकांची अत्यंत आवडती आणि लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन' (The Family Man) तिसऱ्या सिझनसह परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) मुख्य भूमिकेत असलेल्या या स्पाय थ्रिलर सिरीजच्या नवीन सिझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेरीस, अमेझॉन प्राईम व्हिडिओने (Amazon Prime Video) राज आणि डीके दिग्दर्शित या शोच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा लेटेस्ट सिझन आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि रोमांचक असणार आहे, ज्यात श्रीकांत तिवारीला धोकादायक शत्रूंचा आणि कुटुंबाला संकटात टाकणाऱ्या मिशनचा सामना करावा लागणार आहे.

'द फॅमिली मॅन सीझन 3' कधी आणि कुठे पाहता येईल?
श्रीकांत तिवारी या अंडरकव्हर स्पायच्या भूमिकेतील मनोज वाजपेयीच्या या सिरीजने मागील दोन सिझन्समध्ये एक खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. 21 नोव्हेंबरला जगातील 240 हून अधिक देशांमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'द फॅमिली मॅन सीझन 3' प्रदर्शित होणार आहे. या सिझनमध्ये श्रीकांत तिवारीला जयदीप अहलावत (रुक्मा) आणि निम्रत कौर (मीरा) यांसारख्या नवीन आणि अधिक शक्तिशाली शत्रूंशी सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा - Jay Bhanushali Mahhi Vij Divorce: लग्नानंतर 14 वर्षांनी जय आणि माहीचा घटस्फोट; 3 मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोणाकडे?

परतणाऱ्या कलाकारांची मांदियाळी आणि दिग्दर्शन
या सिझनमध्ये नेहमीचे सर्व कलाकार परत येत आहेत. यामध्ये शरीब हाश्मी (जेके तळपदे), प्रियमणी (सुचित्रा तिवारी), आश्लेषा ठाकूर (धृती तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी), श्रेया धनवंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी) यांचा समावेश आहे. या सिरीजचे लेखन राज, डीके आणि सुमन कुमार यांनी केले असून संवाद सुमित अरोरा यांचे आहेत. राज आणि डीके यांनी सुमन कुमार आणि तुषार सेथ यांच्यासह या नवीनतम सिझनचे दिग्दर्शनही केले आहे.

दिग्दर्शक राज आणि डीके यांचे मत
सिरीजला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक राज आणि डीके म्हणाले, "गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी 'द फॅमिली मॅन' वर खूप प्रेम केले आहे. आम्हाला माहीत आहे की, प्रेक्षक संयमाने वाट पाहत होते, त्यामुळे ही प्रतीक्षा योग्य ठरावी यासाठी आम्ही या सिझनमध्ये अधिक हाय-ऑक्टेन ॲक्शन, थरारक कथा आणि दमदार परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे." ते पुढे म्हणाले, "या सिझनमध्ये शिकारीच स्वतः शिकार बनतो, कारण श्रीकांतसमोर रुक्माच्या रूपात एक असा धोका उभा राहतो, ज्यामुळे केवळ त्याचे करिअरच नव्हे, तर त्याचे संपूर्ण कुटुंब धोक्यात येते. आम्हाला विश्वास आहे की, 21 नोव्हेंबरला जगभरातील प्रेक्षक मागील दोन सिझनप्रमाणेच, किंवा त्याहून अधिक उत्साहाने हा नवा सिझन पाहतील." या सिरीजचा पहिला सिझन 2019 मध्ये तर दुसरा सिझन 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा - Mahesh Manjrekar : 'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दीड वर्षात सिनेमा...' दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे धक्कादायक भाकीत.. म्हणाले, 'आता आपण गुपचुप...'


सम्बन्धित सामग्री