Great Indian Kapil Show: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कपिल शर्मा शोचा चौथा सीझन; नव्या सीझनमध्ये क्रिकेट दिग्गजांची एन्ट्री

अखेर कपिलने चाहत्यांची उत्सुकता संपवली आणि रिलीज डेटची घोषणा केली. आपल्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रमोशनदरम्यान ट्विटरवरील Ask Me Anything सेगमेंटमध्ये कपिलने मोठा खुलासा केला.

Great Indian Kapil Show: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कपिल शर्मा शोचा चौथा सीझन; नव्या सीझनमध्ये क्रिकेट दिग्गजांची एन्ट्री

Great Indian Kapil Show: कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याच्या लोकप्रिय शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा चौथा सीझन प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील मागील तीनही सीझनना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने या सीझनकडेही सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर कपिलने चाहत्यांची उत्सुकता संपवली आणि रिलीज डेटची घोषणा केली. आपल्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रमोशनदरम्यान ट्विटरवरील Ask Me Anything सेगमेंटमध्ये कपिलने मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा सीझन 20 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पहिल्या एपिसोडमध्ये क्रिकेटमधील दिग्गजांची एंट्री

नव्या सीझनच्या पहिल्या भागासाठी खास पाहुण्यांची एंट्री खास ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरभजन सिंग आणि त्यांची पत्नी गीता बसरा, नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू हे दोन्ही दिग्गज कपल्स पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा – Girija Oak Saree Look : मैत्रिणीची साडी नेसून गिरिजा ओक झाली फेमस; स्वतःच सांगितलं तिचं या अभिनेत्रीसोबतच खास सिक्रेट

विराट कोहली येणार का? कपिलचा खुलासा

चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कपिल म्हणाला की, मी अद्याप विराट कोहलीला भेटलेलो नाही, मात्र भविष्यात भेट झाली तर सर्वप्रथम त्यालाच शोमध्ये आमंत्रित केले जाईल.

हेही वाचा – Dhurandhar: धुरंधरमुळे पाकिस्तानात खळबळ! ल्यारी गँगवॉरमुळे एवढा गोंधळ का उडाला?

कपिलचा व्यस्त प्रमोशन शेड्यूल

सध्या कपिल त्याच्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रमोशनमध्ये गुंतला असून चित्रपट 12 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. त्यामुळे शोच्या नव्या सीझनसाठी तयारीला तुलनेने कमी वेळ मिळाल्याचीही चर्चा आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number