Dhurandhar: आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या धुरंधरने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धडाका करत पहिल्याच विकेंडमध्ये शंभर कोटींच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. अनेक कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिका, टाईट स्क्रीनप्ले आणि ठोस कथा यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये रिमेकची परंपरा वाढत असताना, ‘धुरंधर’ने मौलिक कथानकातून हिंदी प्रेक्षकांसाठी ताजा अनुभव दिला आहे.
हेरगिरीच्या कथेची नव्या पद्धतीने मांडणी
चित्रपट भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय परिस्थिती, गुप्त कारवाया आणि अंडरवर्ल्डमधील सत्तासंघर्षाभोवती फिरतो. मात्र, पारंपारिक स्पाय थ्रिलरपेक्षा ‘धुरंधर’ची शैली वेगळी असून हेरगिरीच्या धाग्यात गँगवॉरचा रोमहर्षक रंग मिसळण्यात आला आहे. कराचीमधील कुप्रसिद्ध ल्यारी परिसरातील गँगवॉरचा उपयोग कथेमध्ये महत्वाच्या साधन म्हणून करण्यात आलेला आहे. तिथल्या गुन्हेगारी टोळ्यांकडून भारतीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती कशी मिळवली जाते, हा मुद्दा दिग्दर्शकाने थरारक पद्धतीने सादर केला आहे.
हेही वाचा - Gaurav Khanna: गौरव खन्ना झाला मालामाल! बक्षिसाच्या रकमेपेक्षा बिग बॉसची फी जास्त; आठवड्याला घ्यायचा 'इतकी' रक्कम
कलाकारांची जोरदार कामगिरी
अक्षय खन्ना, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांनी वास्तविक घटनांवर आधारित व्यक्तिरेखा मोठ्या प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत. अक्षय खन्नाने गँगस्टर रेहमान डकैतची भूमिका केली असून संजय दत्तने त्याला रोखण्यासाठी झटणारा अधिकारी ‘चौधरी अस्लम’ची भूमिका साकारली आहे. तथापी, अर्जुन रामपाल मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. या तिन्ही भूमिकांमुळे चित्रपटाला वास्तवाचा ठोस आधार मिळतो आणि कथानक अधिक प्रखर होतं.
हेही वाचा - Kanika Kapoor : मेगाँग फेस्टिव्हलमध्ये गोंधळ; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरच्या चाहत्यानं थेट...
कराचीतील अंडरवर्ल्डची खरी झलक
चित्रपटात कराचीच्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या सुरू असलेल्या गँगवॉर, स्थानिक राजकारण आणि टोळ्यांमधील सत्तेचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. ‘धुरंधर’ ही केवळ हेरगिरीची कथा नसून पाकिस्तानच्या गुन्हेगारी जगतातील खोलवर रुजलेल्या वास्तवावरही प्रकाश टाकते.
पाकिस्तानात संताप
चित्रपटाच्या यशावर पाकिस्तानातील अनेक समीक्षकांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना खंत वाटत आहे की आपल्या देशातील खऱ्या घटनांवर आधारित कथा करताना पाकिस्तानी चित्रपटसृष्टी अपयशी ठरली. भारतीय दिग्दर्शकानेच त्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय प्रभावीपणे पडद्यावर आणला, यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुरंधरने जोरदार स्क्रिनप्ले, दमदार अभिनय आणि वास्तविक घटनांशी जोडलेली कहाणी यामुळे प्रेक्षकांच्या मनात आपली जागा केली आहे.