Wednesday, July 09, 2025 10:04:30 PM

शेफाली जरीवालाच्या आधी बिग बॉसच्या 'या' 4 स्पर्धकांचाही झाला आहे मृत्यू

शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तथापी, आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीमुळे, रिअॅलिटी शो बिग बॉस चर्चेत आला आहे.

शेफाली जरीवालाच्या आधी बिग बॉसच्या या 4 स्पर्धकांचाही झाला आहे मृत्यू
Edited Image

मुंबई: 'कांटा लगा' फेम बिग बॉस स्पर्धक शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तथापी, आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीमुळे, रिअॅलिटी शो बिग बॉस चर्चेत आला आहे. कारण बिग बॉसला शापित म्हटले गेले आहे. पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाने बिग बॉसला शापित म्हटले आहे. हिमांशी खुराणा आणि शेफाली जरीवाल मैत्रिणी होत्या आणि दोघीही बिग बॉस-13 चा भाग होत्या.

हिमांशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेफालीसोबतचा तिचा फोटो पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की,  'बिग बॉस, ती जागा स्वतः शापित आहे.' अभिनेत्रीने असे का म्हटले आहे? कारण, ज्यांनी बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी चार स्पर्धकांचा अचानक मृत्यू झाला. शेफाली जरीवाल व्यक्तीरिक्त बिग बॉसच्या कोणत्या स्पर्धकांचा मृत्यू झाला? ते जाणून घेऊयात. 

सिद्धार्थ शुक्ला
बालिका वधू सीरियल फेम सिद्धार्थ शुक्ला हा रिअॅलिटी शो बिग बॉस-13 चा विजेता होता. शेफाली जरीवाला या सीझनची स्पर्धक होती. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचे निधन झाले. त्यावेळी तो 40 वर्षांचा होता आणि त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता. बिग बॉस-13 ट्रॉफी जिंकल्यानंतर सिद्धार्थने खूप प्रसिद्धी मिळवली होती, परंतु त्याच्या अचानक मृत्यूने टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.

हेही वाचा - कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे

प्रत्युषा बॅनर्जी

बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचे अकाली निधन झाले होते. प्रत्युषा बिग बॉस-7 ची स्पर्धक होती. 1 एप्रिल 2016 रोजी तिचे निधन झाले. त्यावेळी ती फक्त 24 वर्षांची होती. तिने आत्महत्या केली होती. 

सोनाली फोगट

सोनाली फोगट बिग बॉस-14 ची स्पर्धक होती. सोनाली भारतीय जनता पक्षाशी संबंधित होती. ती भाजपच्या महिला शाखेच्या आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होती. सोनाली यांचे 22 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका होता. 

हेही वाचा - आजपासून फोनवर नाही ऐकू येणार अमिताभ यांचा आवाज; कारण समजताच व्हाल आश्चर्य

स्वामी ओम

बिग बॉस-10 चा स्पर्धक स्वामी ओमचा 3 फेब्रुवारी 2021 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याचे निधन झाले. 
 


सम्बन्धित सामग्री