मुंबई: शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. शेफाली जरीवालाचे कुटुंब आणि तिचे मित्र या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. 28 जून रोजी शेफाली जरीवालाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच आज शेफाली जरीवालाच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हे पाहिल्यानंतर, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शेफालीच्या निधनावर वरुण धवन मीडियावर फडकला -
दरम्यान, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेता वरुण धवनने मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. सेलिब्रिटींच्या निधनावर सध्या होणाऱ्या गोंधळावर आता अभिनेत्याने आपले मत मांडले आहे. या दुःखाच्या वेळी मीडिया चुकीच्या पद्धतीने बातम्या प्रसारित करत असल्याचा आरोप करत वरुण धवनने नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - शेफाली जरीवालाच्या मालमत्तेचा दावेदार कोण असेल? काय आहे नियम? जाणून घ्या
असंवेदनशीलपणे वृत्तांकन -
वरुण धवनने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट लिहिली आहे. अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माध्यमांनी पुन्हा एकदा आणखी एका मृत्यूचे असंवेदनशीलपणे वृत्तांकन केले आहे. मला समजत नाही की तुम्ही लोक एखाद्याचे दुःख का कव्हर करत आहात, प्रत्येकजण याने इतके अस्वस्थ दिसत आहे, यातून कोणाचा काय फायदा होत आहे. माध्यमांमधील माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की कोणीही अशा प्रकारे त्यांच्या शेवटच्या प्रवासाचे कव्हर करू इच्छित नाही.'
हेही वाचा - शेफाली जरीवालाच्या आधी बिग बॉसच्या 'या' 4 स्पर्धकांचाही झाला आहे मृत्यू
दरम्यान, वरुण धवनच्या या पोस्टला बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानेही पाठिंबा दिला आहे. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वरुणची पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. तथापि, याआधीही पारस छाब्राने देखील मीडियावर संताप व्यक्त केला होता.