Govardhan Asrani Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे सोमवारी , 20 नोव्हेंबर रोजी दुपारी मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संध्याकाळी सांताक्रूझ येथील शास्त्री नगर स्मशानभूमीत कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत त्यांचे शांतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
असरानी यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही काळापासून आजारी होते. मृत्यूपूर्वी असरानी यांनी त्यांच्या कुटुंबियांना स्पष्ट सांगितले होते की, त्यांच्या निधनानंतर कोणताही गोंधळ किंवा औपचारिक घोषणा करू नये. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले.
हेही वाचा - Rashmika Mandanna: कोविडनंतरची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली रश्मिका मंदाना! 3,000 कोटींपेक्षा जास्त कमाई करुन गाठला अविश्वसनीय टप्पा
पाच दशकांची गौरवशाली कारकीर्द
गोवर्धन असरानी यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांच्या अप्रतिम विनोदी अभिनयाने त्यांनी प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. 'शोले' मधील त्यांच्या प्रसिद्ध जेलरच्या भूमिकेपासून ते 'चुपके चुपके', 'बावर्ची,' 'छोटी सी बात', 'हेरा फेरी' सारख्या लोकप्रिय चित्रपटांपर्यंत असरानी यांनी भारतीय सिनेमात हास्याचा अमिट ठसा उमटवला.
हेही वाचा - Chiranjeev Perfect Bighadlay: चिरंजीव परफेक्ट बिघडलाय! नव्या पिढीसाठी एक उत्तम कलाकृती
जयपूरपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
असरानी यांचा जन्म जयपूर, राजस्थान येथे झाला. त्यांनी सेंट झेवियर्स स्कूल, जयपूर येथून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी अभिनयाची आवड जोपासत मुंबईकडे प्रस्थान केले. 1970 च्या दशकात ते त्यांच्या करिअरच्या शिखरावर पोहोचले आणि त्या काळात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी अभिनेता ठरले. गोवर्धन असरानी यांचे निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदी टायमिंग आणि नैसर्गिक अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवले. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.