Monday, November 17, 2025 07:12:50 AM

Kantara Chapter 1 : बॉक्स ऑफिसवर कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचा बोलबाला; दक्षिणात्य कलाकारांनी केले चित्रपटाचे कौतुक

'केजीएफ' फेम अभिनेता यश, प्रभास, ज्युनियर एनटीआर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाचे कौतुक केले.

kantara chapter 1  बॉक्स ऑफिसवर कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचा बोलबाला दक्षिणात्य कलाकारांनी केले चित्रपटाचे कौतुक

मुंबई: 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या कांतारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 कोटींहून अधिकची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यादरम्यान, 'केजीएफ' फेम अभिनेता यश, प्रभास, ज्युनियर एनटीआर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाचे कौतुक केले. 

हेही वाचा: Arbaaz Khan Baby : अरबाज खान 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा बनला पिता? पत्नी शूरा खानने गोंडस 'मुलीला' जन्म दिल्याची चर्चा

अभिनेता यशने ट्विट करत 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाचे कौतुक केले. यश म्हणाला, ' ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ''कांतारा चॅप्टर 1'' चित्रपटाने कन्नडसह भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केली. एक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुम्ही खरंच खूप अप्रतिम काम केलंय. यासह, चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही उल्लेखनीय काम केले. ''कांतारा चॅप्टर 1'' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट काम केले'. 

प्रभासनेही ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचे कौतुक केले. प्रभास म्हणाला, 'कांतारा चॅप्टर 1 चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर आहे. हा चित्रपट खरंच खूप सुंदर आहे. कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या कलाकारांनी आणि पदद्यामागील मेहनती कलकारांनी उत्तम काम केलंय'. 

jai maharashtra news

ज्युनियर एनटीआर म्हणाला, 'कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. ''कांतारा चॅप्टर 1'' चित्रपट उल्लेखनीय कामगिरी करत आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टीने खरंच खूप सुंदरपणे आपल्या संस्कृतीची मांडणी केली आहे. कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा'.

30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. यासह, रिषभ शेट्टीने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट काम केलंय. तसेच, इतर कलाकारांनी 'कांतारा' चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती. नुकताच, प्रदर्शित झालेल्या 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटात कर्नाटक राज्यातील संस्कृतीला उत्तमपणे दाखवल्यामुळे, तसेच चित्रपटात सीजीआय आणि वीएफएक्सचा उत्तम वापर असल्याने हा चित्रपट अनेकांना आवडला.


सम्बन्धित सामग्री