मुंबई: काही महिन्यापूर्वीच अभिनेता अरबाज आणि शूरा खानने 'आम्ही आईबाबा होणार आहोत', अशी आनंदाची बातमी दिली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी शूरा खानचं बारसंदेखील झालं होतं. शूराच्या बारश्यासाठी अनेक कलाकार उपस्थित होते. 4 सप्टेंबर रोजी, शूरा खानला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. तसेच, 5 सप्टेंबर रोजी अरबाजची दुसरी पत्नी शूरा खानने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा वडील झाल्यामुळे, खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
बुधवारी, अभिनेता अरबाज आणि शूरा खानने त्यांच्या इस्टाग्राम अकाऊंटवर मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, 'सिपारा खान, तुझं खान कुटुंबात स्वागत आहे'. या पोस्टवर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जन्नत जुबैरने काळ्या रंगाचे हार्ट इमोजी कंमेट केले. सोबतच, अभिनेत्री राशा थडानीने अरबाज आणि शूरा खानला 'हार्दिक शुभेच्छा' केले.
हेही वाचा: Fraud Case: शिल्पा शेट्टीला न्यायालयाकडून झटका! देश सोडून जाण्याची परवानगी नाकारली
अरबाज खानने शूरासोबत कधी लग्न केले?
गेल्या काही दिवसांपासून अरबाज आणि शूरा खान एकमेकांना डेट करत होते. अनेक महिन्यांच्या डेटिंगनंतर 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाज खानने शूरासोबत निकाह केला होता. अरबाज आणि शूराच्या निकाह सोहळ्यात फक्त अरबाज आणि शूराच्या घरातील सदस्यच उपस्थित होते.
यापूर्वी, अरबाज खानने बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत 12 डिसेंबर 1998 रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर, 9 नोव्हेंबर 2002 रोजी अरबाज खान आणि मलायका अरोराला अरहान खान नावाचा मुलगा झाला. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर, अरबाज खान आणि मलायका अरोराने 2016 मध्ये घोषणा केली आणि 2017 मध्ये अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला.