मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम आणि सभा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Passed Away: साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री; पण नियतीच्या एका वळणाने 'दादां'चा राजकीय प्रवास थांबवला
प्राथमिक वृत्तानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात दुर्दैवी विमान अपघाताचे वृत्त समोर आले असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आणि शोकभावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सर्व स्तरांतून चिंता आणि शोक व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: Ajit Pawar: या ठिकाणी होत्या आज अजित पवार यांच्या सभा