नवी दिल्ली: बँक लॉकर वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँक लॉकर सुविधा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर तुम्ही अद्याप बँक लॉकरसाठी अपडेटेड भाडे करारावर स्वाक्षरी केली नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमचे लॉकर सील केले जाऊ शकते किंवा तुम्हाला या सेवेपासून वंचित ठेवले जाऊ शकते. RBI ने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत की सर्व लॉकर धारकांनी नवीन करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
नवीन भाडे करार -
दरम्यान, RBI ने ऑगस्ट 2021 मध्ये बँकांना सर्व विद्यमान लॉकर धारकांसोबत नवीन भाडे करारावर स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले होते. ग्राहकांच्या तक्रारी, तांत्रिक बदल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना लक्षात घेऊन RBI ने ही सूचना दिली होती. जेणेकरून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या लॉकर सुविधेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवता येईल.
हेही वाचा - 15 ऑगस्टपासून बदलणार फास्टॅगसंदर्भातील नियम! वर्षाच्या पाससाठी लागणार 'इतके' पैसे
बँकेच्या नवीन नियमानुसार, आता सर्व लॉकर धारकांना त्यांच्या बँकेसोबत नवीन करारावर स्वाक्षरी करावी लागेल. जुने करार आता वैध राहणार नाहीत. तसेच वापरकर्त्यांनी दिलेल्या वेळेत करारावर स्वाक्षरी केली नाही, तर बँक तुमचे लॉकर सील करू शकते. बँकांनी आरबीआयकडे मार्च 2024 ची अंतिम मुदत डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. बँकांनी RBI ला ग्राहकांना किमान 4 महिने अतिरिक्त वेळ द्यावा, असं म्हटलं आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत दोनदा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा - दलालांपासून सावध रहा..! EPFO सदस्यांना इशारा; 'या' सेवा सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही
अनेक ग्राहकांची अद्याप नवीन भाडे करारावर स्वाक्षरी नाही -
आरबीआयने यापूर्वी दोन वेळा मुदत वाढवूनही अनेक ग्राहकांनी अद्याप नवीन करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे आता बँका कडक कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे तुमचे देखील बँकेत लॉकर असेल आणि तुम्ही अद्याप नवीन भाडे करारावर स्वाक्षरी केली नसेल, तर प्रथम तुमच्या बँकेत जावून तुम्ही या करारावर स्वाक्षरी करू शकता.