नवी दिल्ली: भारतात डिजिटल तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. डिजिटल पद्धतीमुळे अनेक कामे आता घरून करता येणं शक्य झालं आहे. या कामांसाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन झाली आहेत. दरम्यान, EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांना एक अलर्ट जारी केला आहे. EPFO संबंधित सेवांसाठी कोणत्याही अनधिकृत एजंट, सायबर कॅफे किंवा फिनटेक कंपन्यांची मदत घेऊ नका, असं आवाहन आता ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा - आता UPI द्वारे फक्त 10 सेकंदात होणार पेमेंट! सरकारने लागून केले नवीन नियम
EPFO 'या' सेवा मोफत -
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सर्व डिजिटल सेवा - जसे की दावा दाखल करणे, खात्यातून पैसे काढणे, प्रोफाइल किंवा KYC अपडेट करणे आणि तक्रार दाखल करणे पूर्णपणे मोफत, सुरक्षित आणि घरून ऑनलाइन उपलब्ध आहेत. EPFO ने या सूचना जारी करण्याचे कारण सांगितले आहे. अलीकडेच असे दिसून आले आहे की काही खाजगी एजंट या मोफत सेवांच्या बदल्यात लोकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत आहेत. ज्यामुळे सदस्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सदस्यांची गोपनीय माहिती देखील धोक्यात येते आहे.
हेही वाचा - PhonePe, Google Pay, Paytm वरून UPI ट्रान्सफर करताना पैसे अडकले आहेत का? 'या' स्टेप्स फॉलो करून दूर होईल समस्या
EPFO चा सदस्यांना इशारा -
दरम्यान, EPFO ने म्हटले आहे की सदस्यांनी तृतीय पक्ष एजंट किंवा सायबर कॅफेकडून सेवा घेऊ नये. याचे कारण म्हणजे EPFO पोर्टल आणि UMANG अॅपवर या सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत. सेवा जलद, पारदर्शक आणि वापरकर्ता-अनुकूल व्हाव्यात यासाठी EPFO ने अलिकडच्या काही महिन्यांत अनेक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये, आधार प्रमाणीकरणाद्वारे KYC दुरुस्ती आणि सदस्य तपशील दुरुस्ती सुलभ करण्यात आली आहे.