PhonePe, Google Pay, Paytm वरून UPI ट्रान्सफर करताना पैसे अडकले आहेत का? ‘या’ स्टेप्स फॉलो करून दूर होईल समस्या

अनेक वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात परंतु ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

PhonePe, Google Pay, Paytm वरून UPI ट्रान्सफर करताना पैसे अडकले आहेत का? ‘या’ स्टेप्स फॉलो करून दूर होईल समस्या
Edited Image

नवी दिल्ली: आपण फोनपे, गुगल पे, पेटीएम सारख्या यूपीआय अ‍ॅप्स वापरून पेमेंट करतो. परंतु, अनेकदा आपले पेमेंट अडकते. अशावेळी आपल्याला टेंन्शन येतं. परंतु, आता तुम्हाला टेंन्शन घेण्याची गरज नाही. कारण, हे पैसे फोनपे, पेटीएम, गुगल पे सारख्या यूपीआय अ‍ॅप्समधून सहजपणे परत केले जातात. अनेक वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात परंतु ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही ताबडतोब व्यापारी किंवा प्राप्तकर्त्याशी संपर्क साधावा. पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत याची खात्री करावी. 

तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यास 60 सेकंदांच्या आत तुम्हाला संदेश मिळतो. जर तुमच्या अ‍ॅपमध्ये पेमेंट प्रलंबित दिसत असेल तर तुम्ही यूपीआय सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा. याबद्दल तक्रार करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएम अ‍ॅपच्या व्यवहार इतिहासात जावे लागेल. येथे तुम्हाला चुकीचे हस्तांतरण हा पर्याय निवडावा लागेल. तसेच याबाबत तक्रार नोंदवावी लागेल. यानंतर, व्यवहार आयडी, यूपीआय आयडी, रक्कम, तारीख आणि वेळ इत्यादी माहिती देऊन तुम्ही तक्रार करू शकता. 

हेही वाचा – तात्काळ तिकिटासाठी 'आधार प्रमाणीकरण' कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

NPCI आणि RBI शी संपर्क साधा – 

याशिवाय, लँडर बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि व्यवहारातील समस्येबद्दल सांगा. प्रत्येक बँकेकडे यूपीआय पेमेंटसाठी एक समर्पित निवारण यंत्रणा आहे. तथापि, कधीकधी बँका तुम्हाला लेखी तक्रार करण्यास सांगतात किंवा शाखेत जाण्यास सांगतात. 

हेही वाचा – Paytm ने सुरू केली वैयक्तिकृत UPI आयडीची सुविधा! आता मोबाईल नंबर न दाखवता तयार करता येणार यूपीआयडी

तथापी, जर अॅप आणि बँक तुमच्या व्यवहारातील समस्या सोडवत नसेल, तर तुम्ही तुमची तक्रार एनपीसीआयकडे पाठवू शकता. तथापी, जर तुम्हाच्या समस्येची एनपीसीआयकडून सोडवणूक झाली नाही, तर तुम्ही आरबीआयशी संपर्क साधू शकता. एनपीसीआयकडे तक्रार केल्यानंतर 30 दिवसांनीच तुम्ही रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधू शकता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number