Monday, June 23, 2025 11:16:30 AM

Paytm ने सुरू केली वैयक्तिकृत UPI आयडीची सुविधा! आता मोबाईल नंबर न दाखवता तयार करता येणार यूपीआयडी

आता पेटीएमने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्ते आता त्यांचा स्वतःचा वैयक्तिकृत यूपीआय आयडी तयार करू शकतात.

paytm ने सुरू केली वैयक्तिकृत upi आयडीची सुविधा आता मोबाईल नंबर न दाखवता तयार करता येणार यूपीआयडी
Paytm Launches Personalised UPI ID Service
Edited Image

नवी दिल्ली: पेटीएम ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. दररोज लाखो लोक पेटीएम वापरून ऑनलाइन पेमेंट करत आहेत. यासोबतच, ते इतर अनेक आर्थिक सेवांचा लाभ घेत आहेत. आता पेटीएमने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत वापरकर्ते आता त्यांचा स्वतःचा वैयक्तिकृत यूपीआय आयडी तयार करू शकतात.

दरम्यान, पेटीएमने सुरू केलेल्या नवीन सेवेअंतर्गत, वापरकर्ते आता त्यांचा स्वतःचा वैयक्तिकृत यूपीआय आयडी तयार करू शकतात. पेटीएमच्या या नवीन सेवेसह, वापरकर्ते त्यांचा मोबाइल नंबर खाजगी ठेवू शकतात, ज्यामुळे गोपनीयता वाढते. नवीन वैयक्तिकृत यूपीआय आयडीमध्ये, तुम्ही name@ptyes आणि name@ptaxis सारखे यूपीआय आयडी तयार करू शकता. सध्या, ही सुविधा येस बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेने जारी केलेल्या हँडलवर लाईव्ह करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा इतर सर्व बँकिंग हँडलवर देखील लाईव्ह करण्यात येईल.

हेही वाचा - एलोन मस्कच्या Starlink ला भारतात मंजूरी; आता देशभरात थेट उपग्रहावरून इंटरनेट उपलब्ध होणार

मोबाइल नंबरबाबत गोपनीयता बाळगता येणार - 

पेटीएमच्या या बदलामुळे लोकांची वैयक्तिक माहिती जसे की त्यांचा मोबाइल नंबर सुरक्षित राहील. पेटीएमच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही पेमेंटमध्ये अधिक पर्याय आणि गोपनीयता प्रदान करण्यासाठी वैयक्तिक यूपीआय आयडी सादर केला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल नंबर खाजगी ठेवता येईल.

हेही वाचा - आता सीमापार पेमेंट करणे शक्य होणार; RBI ने PayPal ला दिली मान्यता

पेटीएमवर वैयक्तिकृत यूपीआय आयडी कसा तयार करावा? 

प्रथम पेटीएम अ‍ॅपवर जा

आता प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

यूपीआय सेटिंग्ज पर्यायावर जा.

यूपीआय आयडी व्यवस्थापित करा वर क्लिक करा आणि वैयक्तिकृत यूपीआय आयडी पर्यायावर क्लिक करा.

आता नवीन वैयक्तिकृत यूपीआय आयडीची पुष्टी करा आणि सक्रिय करा. वरील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा वैयक्तिकृत यूपीआय आयडीची तयार करू शकता.  
 


सम्बन्धित सामग्री