मुंबई: ऑक्टोबर महिन्यात अनपेक्षितपणे उकाडा वाढल्याने शहरातील लोकांना उन्हाचा तडाखा भासत आहे. यादरम्यान, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पारा 35 अंश तापमानापेक्षा अधिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील आयएमडी वेधशाळेत 37 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, हा ऑक्टोबर महिन्यात गेल्या सात वर्षांत दुसऱ्या क्रमांकाचा उष्णतेचा दिवस ठरला आहे.
'या' राज्यात पाऊस होण्याची शक्यता
हवामान खात्याने रविवारी, 19 ऑक्टोबर 2025 रोजी, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नगिरी, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागात येले अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांबाबत माहिती देण्यात आले आहेत, तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, उन्हाचा तडाखा कायम राहू शकतो.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे जो लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवसांत हा पट्टा अधिक तीव्र होऊ शकतो. या हवामानामुळे पुढील काही दिवस या भागांमध्ये आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातही पावसाची शक्यता आहे. तसेच, दक्षिण अंदमान समुद्रावर आर्वत वारे सक्रिय आहेत आणि 21 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. समुद्रावरही हालचाली वाढल्या आहेत. अरबी समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि पुढील काही दिवसांत तो तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्री भागात सतर्कता आवश्यक आहे.
हेही वाचा: Punha Shivajiraje Bhosale Movie: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान खात्याने राज्यातील तापमान खालीलप्रमाणे नोंदवले आहेत
मुंबई - 31 अंश सेल्सियस
पुणे - 31 अंश सेल्सियस
राजगुरुनगर - 36 अंश सेल्सियस
कोल्हापूर – 30 अंश सेल्सियस
अमरावती - 30 अंश सेल्सियस
चंद्रपूर - 30. 4 अंश सेल्सियस