Sunday, March 08, 2026 10:55:41 PM

Crime News: आई होण्याचं वय नव्हतं, पण...; त्या चिमुरडीची हृदयद्रावक कहाणी, नराधम मौलवीने केलं कोवळ्या जिवाचं आयुष्य उद्ध्वस्त

शेजारील व्यक्तीवरील विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असून, प्रशासनाने मुलगी व नवजात बाळासाठी संरक्षण आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे.

crime news आई होण्याचं वय नव्हतं पण त्या चिमुरडीची हृदयद्रावक कहाणी नराधम मौलवीने केलं कोवळ्या जिवाचं आयुष्य उद्ध्वस्त

उत्तर प्रदेश: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये उघडकीस आली आहे. ज्या व्यक्तीकडे समाज आदर आणि विश्वासाने पाहतो, त्याच व्यक्तीने एका 14 वर्षांच्या निष्पाप मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. शेजारी राहणाऱ्या एका मौलवीने या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या कोवळ्या मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर या भयावह वास्तवावरून वास्तव उघडे पडले आहे. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.

मूळचे अमरोहा येथील असणारे हे मजूर कुटुंब पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी हापूडमध्ये वास्तव्यास आहे. या गरीब कुटुंबाच्या असहाय्यतेचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या 'इस्लाम' नावाच्या मौलवीने हे नीच कृत्य केले. घरात कुणीही नसताना एकटेपणाची संधी साधून तो या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असे. या नराधमाने मुलीला इतक्या भयंकर धमक्या दिल्या होत्या की, जिवाच्या भीतीने तिने आपल्यावर ओढवलेला हा प्रसंग कोणालाही सांगितला नाही. अज्ञानामुळे आणि भीतीमुळे ती गर्भवती राहूनही तिची शारीरिक स्थिती कुटुंबाच्या लक्षात आली नाही.

हेही वाचा: Devendra Fadanvis at Red Fort : 'पुढील वर्षीपर्यंत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार मिळून...', शिवजयंतीनिमित्त लाल किल्ल्यावरून देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

या भयानक वास्तवाचा स्फोट 14 फेब्रुवारीच्या रात्री झाला. रात्री आठच्या सुमारास मुलीच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत जी माहिती समोर आली, ती ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. 14 वर्षांची लेक गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबावर आभाळ कोसळले. या मानसिक धक्क्यातून सावरत ते मुलीला घेऊन घरी परतले आणि काही तासांतच या चिमुकलीने एका बाळाला जन्म दिला.

या अनपेक्षित घटनेनंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने मौलवीने केलेल्या या अमानुष अत्याचाराचा पाढा वाचला. रागाचा आणि संतापाचा उद्रेक झालेल्या मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून 17 फेब्रुवारी रोजी आरोपी मौलवी इस्लाम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवली आणि अवघ्या एका दिवसात, म्हणजेच 18 फेब्रुवारीला या नराधम मौलवीच्या मुसक्या आवळल्या.

सध्या प्रशासनाने पीडित मुलगी आणि तिच्या नवजात बाळाला वैद्यकीय मदत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 'वन स्टॉप सेंटर'मध्ये पाठवले आहे. सुदैवाने त्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, समाजातील असुरक्षिततेवर आणि विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकणारी एक गंभीर चपराक आहे, जी पुन्हा एकदा 'लेकी खरंच सुरक्षित आहेत का?' हा अस्वस्थ करणारा प्रश्न व्यवस्थेसमोर उभा करते.

हेही वाचा: M M Baig Death : धक्कादायक! राहत्या घरात ज्येष्ठ दिग्दर्शकाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत; चार दिवसांनी उघडकीस आली घटना


सम्बन्धित सामग्री