Wednesday, July 09, 2025 09:37:31 PM

मनसेविरोधात नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन

नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन छेडले आहे. हाताला काळ्या फिती बांधत त्यांनी निषेध आंदोलन केले.

मनसेविरोधात नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन

नवी मुंबई: नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन छेडले आहे. हाताला काळ्या फिती बांधत त्यांनी निषेध आंदोलन केले आहे. 

मनसेच्या आंदोलनाविरोधात नवी मुंबई मनपा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स सपोर्ट स्टाफने निषेध आंदोलन केलं आहे. हाताला काळ्या फिती बांधत कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय. नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयातील शवागरामधील कर्मचाऱ्याने मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी लाच मागितली होती. याविरोधात मनसेने आंदोलन केले होते. मंगळवारी मनसेने मनपा रुग्णालय अधीक्षकांचा मांजरपाट कपड्याने सत्कार केला होता. मनसेच्या आंदोलनाविरोधात डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण असून दादागिरी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर, नर्स आणि सपोर्ट स्टाफकडून करण्यात येतं आहे. 

हेही वाचा: अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना

नेमकं काय घडलं?
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शवागरामधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल दोन हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत असताना, "कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो" असं सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्याने नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसलं. दोनशे-पाचशे नव्हे, थेट 2 हजार रुपये अवैधपणे घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. हा प्रकार आजवर ऐकिवात होता, पण आता प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पालिका प्रशासनाची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 

मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मनसेने संताप व्यक्त केला. तसेच मनसेने मनपा रुग्णालय अधीक्षकांचा मांजरपाट कपड्याने सत्कार केला. नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयातील शवागरामधील कर्मचाऱ्याने मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी लाच मागितली होती. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान आज मनसेच्या आंदोलनाविरोधात डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण असून दादागिरी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर, नर्स आणि सपोर्ट स्टाफकडून करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री