Saturday, June 14, 2025 03:31:06 AM

Ganja racket exposed: दक्षिण महाराष्ट्रातील गांजाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

ओडिशातून आणलेल्या 41 किलो गांजाची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा कोल्हापुरात पर्दाफाश. आठ आरोपी अटकेत, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. शिक्षणसंस्था व तरुणांना लक्ष्य. तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक

ganja racket exposed दक्षिण महाराष्ट्रातील गांजाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर: ओडिशातून आणलेल्या गांजाची कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत होलसेल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 41 किलो गांजा, दोन कार, एक दुचाकी आणि नऊ मोबाईल फोन असा सुमारे 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या टोळीने ओडिशातून गांजा खरेदी करून रेल्वेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात आणला जात होता. गांजाची खरेदी प्रति किलो 5 हजार रुपयांना होत असे, तर त्याची होलसेल विक्री 10 हजार रुपये किलो दराने केली जात होती. पुढे किरकोळ विक्रेत्यांकडे तो 25 ते 30 हजार रुपये किलो दराने विकला जात होता. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: माजी सहाय्यक आरोग्य संचालकावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी मेहेरबान

टोळीने गांजाचा पुरवठा कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील वेगवेगळ्या भागात सुरू केला होता. विशेषतः शिक्षणसंस्था, महाविद्यालयीन परिसर, तरुण वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रीत करून टोळीने आपले जाळे उभे केले होते. यामुळे पोलिसांनी गांजाचा पुरवठा आणि मागणीचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून कारवाई केली.

या टोळीच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल फोनमधून महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, व्हॉट्सअ‍ॅप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. 'या प्रकरणाचा तपास सुरु असून, आणखी काही आरोपी लवकरच अटकेत येतील,' अशी माहिती कळमकर यांनी दिली.

हेही वाचा: भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...

गांजाची तस्करी ही संगणकीकृत पद्धतीने होत असल्याचे उघड झाले असून, व्यवहार रोख स्वरूपात करण्यात येत होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेऊन व्यवहारांचा तपासही केला जात आहे.


सम्बन्धित सामग्री