मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने+हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. यात 'द कार्दशियन', 'परम सुंदरी' अशा अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया कोणकोणते चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
वश लेव्हल 2 (Vash Level 2): हा चित्रपट सस्पेंन्स, हॉरर आणि थ्रीलरने परिपूर्ण आहे. चित्रपटात जानकी बोडीवाला, हितु कनोडिया आणि हितेन कुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कृष्णदेव याज्ञिक यांनी केलं आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ज्या लोकांना हृदयविकार आहे, विशेषतः 18 वर्षांखालील मुलांनी हा चित्रपट पाहू नये.
दे कॉल हिम ओजी (They Call Him OG): हा चित्रपट तेलुगू भाषेतील भारतीय अॅक्शन क्राइम चित्रपट आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जो सुजीत यांनी केला आहे. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच, या चित्रपटात प्रकाश राज, इमरान हाश्मी, प्रियांका मोहन, श्रीया रेड्डी, आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
द कार्दशियन सीजन 7 (The Kardashians Season 7): ड्रामा आणि ग्लॅमरने परिपूर्ण असलेला 'द कार्दशियन सीजन 7' ओटीटी वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. या वेब सिरीजमध्ये क्रिस कार्दशियन, कर्टनी कार्दशियन, किम कार्दशियन, क्लोई कार्दशियन, केंडल जेनर आणि काइली जेनर मुख्य भूमिकेत आहेत. 24 ऑक्टोबर 2025 रोजी जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द कार्दशियन सीजन 7' प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा: Piyush Pandey passes away: भारतीय जाहिरातविश्वाचे जादूगार काळाच्या पडद्याआड; फेविकॉल, कॅडबरी मागचे ‘क्रिएटिव्ह मास्टर’ पियूष पांडे यांचे निधन
परम सुंदरी (Param Sundari): 'परम सुंदरी' हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा 2025 मधील रोमँटिक-कॉमेडी बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट दिल्लीतील एका मुलाची गोष्ट दर्शावतो, जो एका डेटिंग ॲपमुळे केरळमधील एका मुलीच्या आयुष्यात येतो. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जाह्नवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. हा चित्रपट, ऑक्टोबर 2025 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.