Thursday, November 13, 2025 08:59:14 AM

Piyush Pandey passes away: भारतीय जाहिरातविश्वाचे जादूगार काळाच्या पडद्याआड; फेविकॉल, कॅडबरी मागचे ‘क्रिएटिव्ह मास्टर’ पियूष पांडे यांचे निधन

भारतीय जाहिरातविश्वातील दिग्गज पियूष पांडे यांचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं. फेविकॉल, कॅडबरी, एशियन पेंट्ससारख्या जाहिरातींनी त्यांनी देशाच्या मनात कायमची छाप सोडली.

piyush pandey passes away भारतीय जाहिरातविश्वाचे  जादूगार काळाच्या पडद्याआड फेविकॉल कॅडबरी मागचे ‘क्रिएटिव्ह मास्टर’ पियूष पांडे यांचे निधन

Piyush Pandey passes away: भारतीय जाहिरातजगतातील एक युग समाप्त झालं आहे. फेविकॉल, कॅडबरी आणि एशियन पेंट्ससारख्या आयकॉनिक जाहिरातींच्या मागे असलेले सर्जनशील दिग्गज पियूष पांडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईतील शिवाजी पार्क येथे शनिवारी होणार आहेत.

चार दशकांहून अधिक काळ जाहिरातविश्वात कार्यरत असलेल्या पियूष पांडे यांनी आपल्या कल्पकतेने आणि देशी विनोदाने भारतीय जाहिरातींना एक नवं रूप दिलं. ते Ogilvy India चे Chief Creative Officer Worldwide आणि Executive Chairman India म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली Ogilvy ही संस्था तब्बल 12 वर्षे देशातील क्रमांक एक जाहिरात संस्था म्हणून ओळखली गेली.

हेही वाचा:Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला क्लीन चिट; पण, सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब CBI च्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान
 

पांडे यांनी 1982 साली ओगिल्वीत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी Sunlight Detergent साठी पहिली जाहिरात तयार केली. त्यानंतर त्यांनी क्रिएटिव्ह विभागात प्रवेश घेतला आणि एकापाठोपाठ एक लक्षवेधी जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर केलं. फेविकॉलच्या ‘जोडतो फेविकॉल से’ पासून ते कॅडबरीच्या ‘कुछ खास है...’ या मोहिमेपर्यंत, त्यांच्या कल्पकतेने भारतीय जाहिरातविश्वात नवा अध्याय रचला.

फक्त जाहिराती नव्हे, तर त्यांनी भारतीय संस्कृतीला जाहिरातींच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या एकतेचा संदेश देणाऱ्या गाण्याचे गीतकारही पियूष पांडेच होते. तसेच त्यांनी Bhopal Express या चित्रपटाचे पटकथालेखनही केले होते. 2013 साली ते Madras Café या जॉन अब्राहमच्या चित्रपटात झळकले होते.

त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारने त्यांना 2016 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. पियूष पांडे यांचं योगदान केवळ जाहिरातीपुरतं मर्यादित नव्हतं; त्यांनी संवादकलेला भारतीयता आणि भावनांचा स्पर्श दिला.

त्यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून म्हटलं, 'भारतीय जाहिरात क्षेत्रातील एक महानायक आपल्यातून गेला. त्यांच्या संवादशैलीत जमिनीशी नातं आणि उब होती. त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.'

हेही वाचा:Bigg Boss Fame Actress: बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या जीवावर बेतली, वडिलांच्या धाडसामुळे वाचले प्राण

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक म्हणाले, '2003 मध्ये पियूषजींनी आमच्या बँकेसाठी ‘कॉमन सेन्स’ या संकल्पनेवर आधारित मोहीम राबवली होती. ते कल्पकतेला भारतीय वास्तवाशी जोडणारे विचारवंत होते.'

पियूष पांडे यांनी ज्या पद्धतीने भारतीय जाहिरात विश्वात एक नवा दर्जा निर्माण केला, तो दीर्घकाळ लक्षात राहील. त्यांच्या सर्जनशीलतेने भारतीय घराघरात ‘ब्रँड’ या संकल्पनेला एक भावनिक चेहरा दिला. आज त्यांचा आवाज थांबला असला तरी त्यांच्या जाहिराती भारतीयांच्या आठवणीत कायम गुंजत राहतील.


सम्बन्धित सामग्री