Tuesday, November 18, 2025 09:10:41 PM

Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला क्लीन चिट; पण, सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब CBI च्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान

सुशांतच्या कुटुंबाचे वकील वरुण सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, 'सीबीआयने सत्य दडपले आहे. तपासात न सादर केलेले चॅट्स, साक्षीदारांचे जबाब, बँक रेकॉर्ड आणि वैद्यकीय अहवाल हे महत्त्वाचे पुरावे आहेत.

sushant singh rajput death case रिया चक्रवर्तीला क्लीन चिट पण सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब cbi च्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र, सुशांतचं कुटुंब या निष्कर्षावर समाधानी नसून त्यांनी या रिपोर्टविरोधात न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआयचा तपास अपूर्ण; कुटुंबाचा आरोप 

सुशांतच्या कुटुंबाचे वकील वरुण सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, 'सीबीआयने सत्य दडपले आहे. तपासात न सादर केलेले चॅट्स, साक्षीदारांचे जबाब, बँक रेकॉर्ड आणि वैद्यकीय अहवाल हे महत्त्वाचे पुरावे आहेत. आम्ही या क्लोजर रिपोर्टविरोधात न्यायालयात निषेध याचिका दाखल करू.' कुटुंबाचा दावा आहे की सीबीआयने सहाय्यक कागदपत्रे जोडली नाहीत आणि तपासात अनेक बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

हेही वाचा - Siddharth Jadhav Birthday : सैतान आला सैतान... सिद्धार्थ जाधवचा धडकी भरवणारा लूक, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मध्ये कोणती भूमिका?

क्लोजर रिपोर्ट काय म्हटलं आहे?

मार्च महिन्यात दाखल झालेल्या या अहवालानुसार, सुशांतने आत्महत्या केली असून रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा त्यांच्या मृत्यूशी थेट संबंध नाही. दरम्यान, 8 जून 2020 रोजी रिया सुशांतच्या घरातून निघून गेली आणि 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह सापडण्यापर्यंत तिचा त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. आर्थिक व्यवहारांमध्येही कोणताही गैरवापर झाल्याचे पुरावे आढळले नाहीत.

हेही वाचा Rishabh Tondon: गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (फकीर) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संगीतविश्वात शोककळा

आर्थिक व्यवहारांचा तपास

तपासात उघड झाले की, रियाने सुशांतच्या परवानगीशिवाय कोणतीही मालमत्ता वापरली नाही. 2018 ते 2020 दरम्यान दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतनेच तिच्या काही खर्चांची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) अंतर्गत कोणतीही कारवाई लागू होत नाही, असे सीबीआयने नमूद केले. सीबीआयचा हा क्लोजर रिपोर्ट 20 डिसेंबर रोजी पाटणा न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. सुशांतच्या कुटुंबाने मात्र या रिपोर्टविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला असून सत्य बाहेर यायलाच हवं, असं कुटुंबाने स्पष्ट केलं आहे.
 


सम्बन्धित सामग्री