Thursday, May 22, 2025 05:36:04 PM

2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कोणताही कर नाही! अर्थ मंत्रालयाने केले अफवांचे खंडन

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही बातमी खोटी, दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या upi व्यवहारांवर कोणताही कर नाही अर्थ मंत्रालयाने केले अफवांचे खंडन
UPI transactions
Edited Image

Tax On UPI Transactions: 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कोणताही कर लागणार नाही, असं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया आणि इतर स्रोतांवर अलीकडेच व्हायरल होणाऱ्या बातम्यांचे पूर्णपणे खंडन केले आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की सरकार 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची तयारी करत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही बातमी खोटी, दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

पीआयबीच्या मते, सरकार 2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लादण्याचा विचार करत आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. सध्या सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. यामुळे सामान्य वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

डिजिटल पेमेंटसाठी सरकारची वचनबद्धता - 

सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चारही निवेदनात करण्यात आला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे देशातील डिजिटल व्यवहारांचे एक प्रमुख माध्यम बनले आहे आणि सरकारचे धोरण ते अधिक सुलभ आणि शुल्कमुक्त बनवण्याचे आहे.

हेही वाचा - फोन चोरीला गेला? हरवला? नो टेन्शन; 'या' सोप्या स्टेप्सने FIR न करता सुद्धा परत मिळू शकतो

एमडीआर आणि जीएसटीमध्ये काय संबंध आहे?

व्यवहारादरम्यान आकारल्या जाणाऱ्या शुल्कांवरच जीएसटी लागू होतो, जसे की मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) असे स्पष्ट करण्यात आले. परंतु सरकारने जानेवारी 2020 पासून व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) UPI व्यवहारांवरील MDR पूर्णपणे काढून टाकला आहे. ही घोषणा 30 डिसेंबर 2019 च्या अधिसूचनेअंतर्गत करण्यात आली होती. आता UPI वर कोणताही MDR लागू नसल्याने, या व्यवहारांवर GST आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हेही वाचा - EPFO ​​PF Withdrawal New Changes: आता पीएफचे पैसे काढणे होणार सोपे; काय आहे नवीन बदल? जाणून घ्या

UPI व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचा GST नाही - 

दरम्यान, सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या 2000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचा GST लादण्याची कोणतीही योजना नाही. उलटपक्षी, सरकार डिजिटल पेमेंटला अधिक बळकटी देण्यासाठी सतत काम करत आहे. नागरिकांनी फक्त सरकारी स्रोतांकडूनच माहिती घ्यावी आणि अफवांपासून दूर राहावे, असं आवाहनही सरकारने केलं आहे.  
 


सम्बन्धित सामग्री