Ahmedabad Plane Crash Update: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एअर इंडियाचे 787-8 ड्रीमलाइन विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. या विमानात 242 लोक होते. यापैकी सर्वांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, या विमान अपघाताचे कारण चौकशीनंतरच उघड होईल. मात्र, आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, या विमान अपघाताची चौकशी कोण करणार? तसेच विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी नियम काय आहेत? चला तर मग या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
विमान नियम 1937 अंतर्गत, पूर्वी भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) हवाई सुरक्षा संचालनालय विमान अपघातांची चौकशी करत असे. नंतर, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (आयसीएओ) जारी केलेल्या मानके आणि शिफारस केलेल्या प्रक्रिया (एसएआरपी) नुसार, भारत सरकारने डीजीसीएपासून एक स्वतंत्र ब्युरो स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अपघातांची चौकशी करण्यासाठी 2012 मध्ये नियम तयार करण्यात आले.
हेही वाचा - मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन
विमान अपघात तपास ब्युरो -
विमान अपघातांच्या चौकशीच्या उद्देशाने, भारत सरकारने 30 जुलै 2012 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयात एक ब्युरो स्थापन केला. या संस्थेचे नाव विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) असे आहे. नंतर नियमांमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आल्या. सध्या, सुधारित विमान नियम 2017 आणि विमान सुधारणा नियम, 2021 नुसार तपास केला जात आहे.
हेही वाचा - ब्रेकिंग! एअर इंडिया विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; DNA चाचणीनंतर पटणार मृतदेहांची ओळख
दरम्यान, AAIB ला कोणत्याही एजन्सी/संस्थेकडून सर्व संबंधित पुरावे त्वरित आणि अनिर्बंधपणे मिळवण्याचा अधिकार देण्यात आला आहे, त्यासाठी न्यायिक संस्था किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांकडून पूर्व संमती घेण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे, AAIB अहमदाबाद विमान अपघाताची देखील चौकशी करेल. याशिवाय, ATS, ग्राउंड स्टाफ, CISF, अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून मिळालेले इनपुट देखील तपासात मदत करतील.
याशिवाय, अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) एजन्सी देखील मदत करू शकते. तथापि, 2020 मध्ये कोझिकोड येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी AAIB टीमने एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी, ATS, ग्राउंड स्टाफ, CISF, अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या मदतीने करण्यात आली होती.