अहमदाबाद: गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपाणी नेहमी 1206 हा अंक शुभ मानत असतं. आता याच लकी नंबरच्या तारखेला रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा लकी नंबर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा नंबर ठरला. विजय रुपाणी यांनी वर्षानुवर्षे त्यांच्या सर्व वाहनांचा नोंदणी क्रमांक सारखाच ठेवला होता.
1206 होता विजय रुपाणी यांचा लकी नंबर -
माजी मुख्यमंत्री रुपाणी यांनी 1206 हा त्यांचा लकी नंबर मानला होता, परंतु आता तो त्यांच्या शेवटच्या प्रवासाची तारीख, 12 जून (12/06) बनला आहे. त्यांच्या वाहनांचा नोंदणी क्रमांक देखील 1206 होता. राजकोटमधील स्थानिक आणि पत्रकारांच्या मते, रूपाणींच्या स्कूटर आणि कारचा नोंदणी क्रमांक 1206 हाच होता. मात्र, आता हा नंबर भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी घेतली दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या कुटुंबियांची भेट
प्राप्त माहितीनुसार, विजय रुपानी हे त्यांच्या मुलीच्या लंडनमधील घरी जात होते, जिथे त्यांच्या पत्नी अंजलीबेन आधीच राहत आहेत. त्या भाजपच्या सक्रिय सदस्या देखील आहेत. अंजलीबेन शुक्रवारी सकाळी गांधीनगरला पोहोचल्या. गुजरात राज्य भाजप प्रमुख आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी गुरुवारी विमान अपघातात रुपानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
हेही वाचा - 'मी उडी मारली नाही...'; अहमदाबाद विमान अपघातात बचावलेल्या प्रवाशाने सांगितली आपबीती
विजय रुपाणी यांनी ऑगस्ट 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. रुपाणी यांनी विद्यार्थी नेते म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. आणीबाणीच्या विरोधात निषेध केल्याबद्दल 1975 मध्ये रुपानी यांना भावनगर तुरुंगात एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता.