New Rules October 2026: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून बँक व्यवहार, डिजिटल पेमेंट, एलपीजी गॅस आणि पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सॅलरी अकाउंट ग्राहकांसाठी इतर बँकांच्या ATM वरून मिळणाऱ्या मोफत व्यवहारांची मर्यादा आता 10 वरून 5 पर्यंत खाली आणण्यात आली आहे. यात कॅश काढण्यासोबतच बॅलन्स तपासण्याचाही समावेश असेल. मात्र, SBI च्या स्वतःच्या ATM वर सॅलरी खातेदारांना पूर्वीप्रमाणेच अमर्यादित मोफत व्यवहार करता येणार आहेत. याशिवाय, बँकांना बल्क फिक्स्ड डिपॉझिटचे (Bulk FD) व्याजदर दररोज ऑनलाइन जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
LPG सबसिडीसाठी ई-केवायसी अनिवार्य
1 ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरची सबसिडी मिळवण्यासाठी ग्राहकांना आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल. हे व्हेरिफिकेशन न केल्यास 14.2 किलो सिलिंडरवरील सबसिडीची रक्कम मिळणार नाही.
NPS खाते उघडणे होणार महाग
तसेच, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये PoP द्वारे नवीन खाते उघडताना आता प्रत्येक PRAN मागे 200 रुपये जॉइनिंग चार्ज द्यावा लागेल.
हेही वाचा – महाराष्ट्रातील दुष्काळाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
15 ऑक्टोबरपासून 2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर लागण्याची शक्यता
डिजिटल पेमेंट करणाऱ्या युजर्ससाठी 15 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI मर्चंट व्यवहारांवर MDR (मर्चंट डिस्काउंट रेट) आकारला जाऊ शकतो. मात्र, 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी शून्य-MDR अंतर्गत होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडण्यापूर्वीच सर्वसामान्यांनी या आर्थिक बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे.