केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या. नवोपक्रम आणि वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतनेट प्रकल्पांतर्गत सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड जोडणी दिली जाईल. तसेच, विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात भारतीय भाषा पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना राबवली जाणार आहे.
Union Budget 2025: महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 6640 कोटींची तरतूद!
देशभरातील IIT संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या 10 वर्षांत दुपटीने वाढली आहे. नवीन पायाभूत सुविधा उभारून अजून 6,500 विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जाणार आहे. IIT पाटणा येथील वसतिगृह आणि प्रयोगशाळांचेही आधुनिकीकरण होणार आहे.
FDI In Insurance : शंभर टक्के FDI! विमा क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीस मंजुरी
संशोधन आणि नवोपक्रमासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, IIT आणि IISc मध्ये दहा हजार संशोधन फेलोशिपसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
500 कोटी रुपयांच्या खर्चासह शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले जाणार आहे. याशिवाय, तरुणांना जागतिक स्तरावर प्रशिक्षित करण्यासाठी पाच राष्ट्रीय कौशल्य उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील.
या उपायांमुळे शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला मोठी चालना मिळेल आणि भारत नवोपक्रमाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेल.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.